-   मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सई लोकूर सोशल मीडिय़ावर प्रचंड सक्रिय असते. 
-  सई वेगवेगळ्या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते. 
-  तसचं ती पती तीर्थदीप रॉय सोबतचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करते. 
-  सध्या सई पती तीर्थदीप रॉयसोबत मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. 
-  मालदीवमध्ये धमाल करतानाचे अनेक फोटो सईने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 
-  या फोटोंमध्ये सईचा बोल्डलूक पाहायला मिळतोय. 
-  मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर निवांत क्षण एन्जॉय करतानाचे फोटो सईने शेअर केले आहेत. 
-  अनेक चाहत्यांनी सईच्या लूकला पसंती दिलीय. तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलंय. 
-  सईने लाल रंगाच्या स्विमसूटमधील दोन फोटो शेअर केले आहेत. यावर कमेंट करत एक युजर म्हणाला, “वाईट दिसतेयस. मराठी संस्कृतीला शोभत नाही. असे खासगी फोटो टाकू नये” 
-  तर दुसरा युजर कमेंट करत म्हणाला, “असले फोटो का पोस्ट करावे लागतात” 
-  तर सईने समुद्र किनाऱ्यावरील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर स्विमिंगसूटवर कमरेभोवती पांढऱ्या रंगाचा स्विमसूट स्कॉर्फ बांधला आहे. 
-  सई या फोटोंमध्ये सुंदर आणि आनंदी दिसतेय. 
-  मात्र सईच्या या फोटोवर एक युजर कमेंट करत म्हणाला, “वजन कमी करावे लागेल.” 
-  दुसरा युजर म्हणाला, “लेडी पैलवान” 
-  तर आणखी एक युजर म्हणाला, “साडीत छान दिसतेस तू” 
-  काही नेटकऱ्यांनी सईला तिच्या बोल्ड लूकमुळे ट्रोल केलं असलं. तरी तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंना पसंती दिलीय. 
-  सई पारंपरिक कपड्यांसोबतच या बोल्ड लूकमध्येदेखील सुंदर दिसत असल्याचं तिचे चाहते म्हणाले आहेत. 
-  सईने मालदीवमध्ये तिच्या पतीसोबत स्विमिंगपूलमध्ये ब्रेकफास्ट करण्याची मजा लुटली आहे. 
-  पतीसोबत बोटींगचा आनंद घेताना. 
-  समुद्र किनाऱ्यावर एकांतात रमलेली सई 
-  पतीसोबत काही निवांत क्षण(फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम-सई लोकूर) 
“असले फोटो का पोस्ट करावे लागतात”; मालदीवमधील बोल्ड फोटो शेअर केल्याने सई लोकूर ट्रोल
Web Title: Big boss marathi fame sai lokur troll sharing bold photo from maldives kpw