-
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानसाठी युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. रोहतगी यांच्या न्यायालयातील युक्तिवादापैकी १० प्रमुख युक्तिवादांचा हा आढावा.
-
अरबाजकडे ड्रग्ज आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
वादासाठी आर्यनला अरबाजकडे ड्रग्ज असल्याचं माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकतो : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
एनसीबी याला षडयंत्र म्हणत आहे. पण आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचं सांगितलंय : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
आर्यनवर षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर एका कटाचा भाग आहे : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
जहाजावर सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
-
अरबाजने ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असा आरोप गृहीत धरला तरी त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही : मुकुल रोहतगी (वरिष्ठ वकील)
Aryan Khan Bail Hearing : आर्यन खानच्या जामिनासाठी मुकुल रोहतगींनी केलेले १० प्रमुख युक्तिवाद
भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानसाठी युक्तिवाद केला. यापैकी १० प्रमुख युक्तिवादांचा हा आढावा.
Web Title: Important argument of mukul rohatgi in aryan khan bail hearing mumbai high court pbs