• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. i get 50 threat calls daily comedian munawar faruqui says he is not being allowed to work scsg

“धमकावणारे रोज ५० फोन कॉल मला येतात, दिवसातून तीनदा मी SIM कार्ड बदलतो; सर्वाधिक भीती तर…”

मुंबईमध्ये १५०० तिकीटांची विक्री झालेले त्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले, त्याचसंदर्भात तो बोलताना नक्की काय घडलंय याबद्दल व्यक्त झालाय.

November 3, 2021 13:47 IST
Follow Us
  • Comedian Munawar Faruqui says he is not being allowed to work
    1/18

    मला रोज ५० धमकीचे फोन येतात, असं त्याने एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

  • 2/18

    दिवसातून मला तीन वेळा सीम कार्ड बदलावे लागतात. माझा फोन नंबर कोणीतरी लीक केला असून अनेकजण मला फोन करुन धमकावतात, अश्लील भाषेत आरडाओरड करतात असं त्याने याच मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

  • 3/18

    नुकतेच मुंबईमधील त्याचे तीन शो रद्द झाले आहेत ज्याची एकूण १५०० तिकीटं महिन्याभरापूर्वीच विकली होती असं तो म्हणतो.

  • 4/18

    आपल्या देशातील अनेक लोक अशापद्धतीने (दबावाखाली) राहतात हे खेदजनक आहे, असं तो म्हणतो.

  • आता हे सारं वाचून तुम्हाला वरील व्यक्ती एकादा आरोपी किंवा गुन्हेगार वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकलाय. हे वरील सर्व अनुभव आहेत, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे असून त्याने ही सर्व माहिती एनडीटीव्हीशी बोलताना दिलीय.
  • 5/18

    हिंदूत्वादी गट मागील १० महिन्यांपासून सतत मुनव्वरला लक्ष्य करत आहेत.

  • 6/18

    इंदुर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिंदू देवी-देवतांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणार असल्याचा दावा करत मुन्नवरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

  • 7/18

    भाजपा नेत्याच्या मुलाने केलेल्या आरोपांवरुन इंदुरमधील कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच पोलिसांनी मुन्नवरला ताब्यात घेतलेलं.

  • 8/18

    मात्र नंतर इंदुर पोलिसांनी मुन्नवर हिंदू देवतांचा किंवा भावनांचा अपमान करणारं वक्तव्य करणार होता यासंदर्भातील कोणताही दृष्य स्वरुपातील पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं होतं.

  • 9/18

    सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये मुन्नवरला जामीन देण्याबरोबरच त्याच्या याचिकेवरुन मध्यप्रदेश पोलिसांना नोटीस पाठवून प्रकरणाची माहिती मागवली आहे.

  • 10/18

    बजरंगदलचे लोक माझ्या दोन तासांच्या कार्यक्रमातील १० सेकंदांची क्लिप व्हायरल करुन माझ्यावर आरोप करत आहेत, असं मुन्नवर सांगतो. मात्र ते वक्तव्य संदर्भ तोडून दाखवलं जात असल्याचंही त्याने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.

  • 11/18

    फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आपण आतापर्यंत ५० हून अधिक कार्यक्रम केले असून त्यापैकी ९० टक्के कार्यक्रमांमध्ये मला स्टॅण्डींग अवेशन मिळाल्याचं मुन्नवर सांगतो.

  • 12/18

    माझे कार्यक्रम पहायला येणाऱ्यांना माझ्या धर्माशी काही देणं घेणं नसतं असं मुन्नवर सांगतो.

  • 13/18

    मात्र धर्मावरुन टार्गेट केलं जात असल्याची सर्वाधिक भीती वाटत असल्याचं मुन्नवर सांगतो. माझ्या प्रकरणामध्ये ते मला माझ्या धर्माबद्दल बोलून घाबरवण्याचा प्रयत्न करतायत ज्याची मला फार भीती वाटतेय, असंही तो स्पष्टपणे सांगतो.

  • 14/18

    आपल्या एका कार्यक्रमावर ८० जणांचा रोजगार अवलंबून आहे. करोनामुळे मागील दीड वर्षांपासून हे कामगार बेरोजगार आहेत. आता या असल्या गोष्टींमुळे कार्यक्रम रद्द होत आहेत हे खेदजनक आहे, असं तो म्हणतो.

  • 15/18

    मुनव्वरला मुंबईत होणारे तीन शो नुकतेच रद्द करावे लागले आहेत. गुजरातच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यानंतर मुनव्वर फारुकीचे तीन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

  • 16/18

    मुंबईच्या वांद्र्यातील रंगशारदा सभागृहाच्या मालकाला धमकावल्याने त्यांनी ३० आणि ३१ ऑक्टोबरचे हे शो रद्द केले आहे. तर बोरिवलीतील एका सभागृहाच्या मालकालाही धमकावण्यात आल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आले.

  • 17/18

    द्वेष जिंकतोय म्हणून कार्यक्रम रद्द होतात, पण हे कधीपर्यंत चालू राहणार? आपण नक्की जिंकू असा विश्वास मुन्नवरने हे शो रद्द झाल्यानंतर व्यक्त केलाय. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठीMarathi

Web Title: I get 50 threat calls daily comedian munawar faruqui says he is not being allowed to work scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.