-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मागील १७ वर्षांपासून कांस येथील रेड कार्पेटमध्ये सहभागी होत आहे. २०१८ मध्ये ऐश्वर्या जेव्हा रेड कार्पेटवर आली तेव्हा तिच्या मेकअपवर अनेकांनी टीका केली. यावरून ऐश्वर्याला ट्रोलही करण्यात आलं.
-
यानंतर ऐश्वर्या मुंबईला परतली तेव्हा तिने मेकअप आणि फॅशनवर मोठं विधान केलं. समाजात एक-दुसऱ्यावर शेरेबाजी करण्यापासून सर्वांनीच दूर राहिलं पाहिजे, असं तिने म्हटलं.
-
याशिवाय ज्या महिला मेकअप करतात त्यांच्याकडे बुद्धी नसते, त्या मुर्ख आणि असंवेदनशील असतात असा अर्थ होत नाही, असंही ऐश्वर्याने नमूद केलं.
-
एक महिला म्हणून एकमेकांवर टीका करणं बंद करायला हवं असंही आवाहन ऐश्वर्याने केलं.
-
मेकअप आहे किंवा नाही म्हणून कुणाविषयीही देखील मतं बनवू नये असंच ऐश्वर्याने यातून सुचित केलं होतं.
-
मेकअप आहे म्हणजे मुर्ख आणि मेकअप नसेल तर ती व्यक्ती बुद्धिमान असं काही नाही, असं तिने सांगितलं.
-
एकूणच समाजाने मेकअपवरून एखाद्या व्यक्तीविषयीची पूर्वग्रहदुषित मतं बनवू किंवा व्यक्त करू नये, असंच तिने सांगितलंय. (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
ऐश्वर्याच्या मेकअपवरील या प्रतिक्रियेनंतर मेकअपविषयी सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या.
Photos : मेकअपवरून ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री ऐश्वर्या राय संतापली, दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
२०१८ मध्ये ऐश्वर्या जेव्हा रेड कार्पेटवर आली तेव्हा तिच्या मेकअपवर अनेकांनी टीका केली. यावरून ऐश्वर्याला ट्रोलही करण्यात आलं.
Web Title: Know why actress aishwarya rai angry on trolling for makeup on red carpet pbs