-
‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत आली होती.
-
तिच्या या हटके फॅशनमुळे नेटकऱ्यांकडून चांगलंच ट्रोल देखील केलं जाते. पण त्याकडे ती दुर्लक्ष करते.
-
नुकतंच उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट करत एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिने मला आत्महत्या करण्याचे विचार येतात, असे म्हटले होते.
-
उर्फीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तीन फोटो शेअर केले आहेत. यात उर्फीने ब्रा आणि जीन्स परिधान केली आहे. हे फोटो शेअर करत तिने एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.
-
यात उर्फीने तिच्या आयुष्यातील संघर्षांविषयी सांगितले आहे. हे फोटो शेअर करत ती म्हणाली, “तुम्हाला माहितीये मी किती वेळा अयशस्वी झाले? मी तर आता मोजायचे सोडून दिले आहे.”
-
“आयुष्यात काही वेळा मला असे वाटले की या गोंधळातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माझे जीवन संपवणे. माझ्या आयुष्यात खूप अडचणी होत्या,” असेही उर्फी म्हणाली.
-
“अयशस्वी करिअर, अयशस्वी नातेसंबंध, पैसे नसल्यामुळे मला असे वाटू लागले की माझ्यासारख्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही”, असेही तिने यावेळी सांगितले.
-
“माझ्याकडे अजून ही जास्त पैसे नाहीत, यशस्वी करिअर नाही आणि मी अजूनही सिंगल आहे पण तरी मला आशा आहे,” असेही ती म्हणाली.
-
“मी आता जिवंत असण्याचं एकमेव कारण म्हणजे मी कधीच थांबत नाही. मी चालत राहते आणि अजूनही मी चालतेय”, असेही तिने म्हटले.
-
“मला जिथे पाहिजे तिथे मी आता नसेन पण किमान मी माझ्या रस्त्यावर आहे. उठा, लढा, पुन्हा करा. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या परिस्थितींपेक्षा तुम्ही मजबूत आहात.” असेही उर्फी म्हणाली.
“मी अजूनही सिंगल पण…”, उर्फी जावेदच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा
नुकतंच उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट करत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Web Title: Urfi javed opens up about having suicidal tendencies reveals failed career failed relationships nrp