• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. naina singh says kumkum bhagya makers are destroying her acting career said i was kicked out of three web series nrp

“…त्यांनी मला करियर संपवण्याची धमकी दिली”, ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील अभिनेत्रीने निर्मात्यांवर केला गंभीर आरोप

त्यानंतर ती बिग बॉसमधून बाहेर पडली.

January 27, 2022 19:22 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या हिंदी बिग बॉसचे १४ वे पर्व सुरु आहे.
    1/15

    छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या हिंदी बिग बॉसचे १४ वे पर्व सुरु आहे.

  • 2/15

    अभिनेत्री नैना सिंह हिने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एंट्री केली. मात्र अवघ्या दोन आठवड्यात तिचे एलिमिनेशन झाले. त्यानंतर ती बिग बॉसमधून बाहेर पडली.

  • 3/15

    यानंतर अभिनेत्री नैना सिंह हिने ई टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीतील वाईट आठवणी आणि करोना काळाबद्दल सांगितले.

  • 4/15

    या मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’ आणि ‘कुमकुम भाग्य’च्या निर्मात्यांवर तिचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.

  • 5/15

    यावेळी नैना म्हणाली की, “बिग बॉस १४ केल्यानंतर माझे आयुष्य खराब झाले.”

  • 6/15

    “कुमकुम भाग्य मालिका सोडल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. पण ‘बिग बॉस’ केल्याचा मला पश्चाताप होतो.” असेही ती म्हणाली.

  • 7/15

    “त्यावेळी ‘बिग बॉस’मध्ये असल्यामुळे आम्हाला हे नको आहे, असे अनेकजण सांगत होते. बिग बॉसनंतर तर या गोष्टी आणखी बिघडत गेल्या,” असेही तिने म्हटले.

  • 8/15

    “मी माझ्या आयुष्यात कधीही ‘बिग बॉस’ पाहिले नव्हते. मी हा शो तेव्हाच पाहिला जेव्हा सिद्धार्थ शुक्ला त्यात होता. मी त्याची चाहती आहे,” असेही ती म्हणाली

  • 9/15

    “कोरोना सुरू आहे या विचाराने मी ‘बिग बॉस’ची ऑफर स्विकारली होती. पण त्यावेळी माझी वाईल्ड कार्ड एंट्री होईल असे मला सांगण्यात आले नव्हते. मला ३ आठवडे हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. माझा वेळ तिथे वाया गेला. बिग बॉसच्या घरापेक्षा मी जास्त दिवस क्वारंटाईनमध्ये घालवले,” असेही ती म्हणाली.

  • 10/15

    “त्यामुळे आता जर मला पुन्हा ‘बिग बॉस’ची ऑफर मिळाली तर मी तो करणार नाही. कारण त्यांना काय हवे आहे, हे मला माहित आहे,” असेही तिने यावेळी सांगितले.

  • 11/15

    “मी काम मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण माझे काम कुठेही होत नाही. जेव्हा मी ‘कुमकुम भाग्य’ मालिका सोडली तेव्हा निर्मात्यांनी मला करियर संपवण्याची धमकी दिली होती. मला काम मिळू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले,” असा आरोपही तिने यावेळी केला.

  • 12/15

    “मी आता गप्प बसणार नाही. आधी मला वाटत होते की कोणाच्याही कारकिर्दीत कोणीही काही करू शकणार नाही. कारण सर्व ऑडिशन्स त्या कलाकाराला द्याव्या लागतात. पण माझ्या बाबतीत हे सर्व उलट घडले,” असे ती म्हणाली.

  • 13/15

    “मला तीन वेब सीरिजमधील अनेक सीन्समधून वगळण्यात आले. मी खूप प्रयत्न करत आहे, पण त्या पातळीवर कोणीतरी आहे जो मला बाहेर काढतो,” असे नैनाने सांगितले.

  • 14/15

    नैना सिंह ही राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियन आहे. तिने २०१३ मध्ये फेमिना मिस स्टायलिश दिवाचा किताब जिंकला आहे.

  • 15/15

    त्यानंतर २०१७ मध्ये ती ‘स्प्लिट्सविला 10’ ची विजेती ठरली होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर ती कुमकुम भाग्य आणि बिग बॉसमध्येही झळकली होती. (सर्व फोटो – नैना सिंह/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Naina singh says kumkum bhagya makers are destroying her acting career said i was kicked out of three web series nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.