Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor anupam kher happy birthday special love story wife kirron kher some beautiful unseen pictures of the couple sdn

Photos : मैत्री, घटस्फोट आणि लग्न; अशी आहे अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी

Updated: March 7, 2022 10:28 IST
Follow Us
  • Anupam Kher Birthday Kirron Kher Love Story
    1/18

    बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता अनुपम खेर यांचा आज वाढदिवस.

  • 2/18

    अनुपम खेर यांनी वयाच्या २८ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली.

  • 3/18

    अनुपम खेर यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 4/18

    अनुपम यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे.

  • 5/18

    २६ ऑगस्ट १९८५ रोजी या दोन दिग्गज कलाकारांनी लग्नगाठ बांधली.

  • 6/18

    दोघंही त्यांच्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखले जातात.

  • 7/18

    या दोघांची लव्हस्टोरी तितकीच रंजक आहे.

  • 8/18

    किरण खेर आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचं नातं होतं.

  • 9/18

    प्रेम किंवा लग्न हा विचारदेखील त्यांना स्पर्शून गेला नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची मुंबईमध्ये भेट झाली.

  • 10/18

    मात्र, यावेळी दोघांचंही लग्न झालं होतं. त्याकाळामध्ये अनुपम खेर आणि किरण खेर दोघेही काम करण्यासाठी स्ट्रगल करत होती.

  • 11/18

    यादरम्यान दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

  • 12/18

    स्ट्रगल काळातच अनुपम खेर यांना १९८५ साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला.

  • 13/18

    या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

  • 14/18

    विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.

  • 15/18

    याचदरम्यान किरण खेर यादेखील त्यांचा पती गौतम बेरी यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.

  • 16/18

    घटस्फोटानंतरही किरण आणि अनुपम हे आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करुन होते.

  • 17/18

    त्याचवेळी त्यांची पुन्हा एकदा कोलकातामध्ये नादिरा बब्बर यांच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 18/18

    विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अनुपम यांनी किरण यांना लग्नाची मागणी घातली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी किरण यांच्या मुलाला सिकंदरला देखील स्वत:चं नाव दिलं. (सर्व फोटो सौजन्य : अनुपम खेर / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actor anupam kher happy birthday special love story wife kirron kher some beautiful unseen pictures of the couple sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.