Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut birthday know about her 5 most controversial statement mrj

भीक म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य ते रक्तपिपासू राक्षसीण; कंगना रणौतची ‘ती’ ५ वादग्रस्त वक्तव्य!

कंगना रणौत तिच्या बॉलिवूड करिअरपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत राहिली आहे.

March 23, 2022 15:21 IST
Follow Us
  • बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
    1/15

    बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/15

    एकपेक्षा एक हिट चित्रपट देणारी कंगना तिच्या बॉलिवूड कारकिर्दीपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे.

  • 3/15

    सामाजिक असो वा राजकीय, कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करणारी कंगना रणौत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

  • 4/15

    आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही वेळा कंगनाला टीकेचा सामना करावा लागलाय, तर काही वेळा ही प्रकरणं थेट न्यायालयातही गेलीत.

  • 5/15

    सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनानं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर गंभीर आरोप केले होते. यात तिने गीतकार जावेद अख्तर यांच्यावर काही आरोप केले होते.

  • 6/15

    कंगनाच्या आरोपांनंतर जावेद अख्तर यांनी तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता आणि याची अंतिम सुनावणी अद्याप झालेली नाही.

  • 7/15

    बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादात कंगना रणौतनं अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांना बी- ग्रेड अभिनेत्री असं संबोधलं होतं.

  • 8/15

    एका मुलखतीत तिने, ‘मी जर बॉलिवूडमध्ये राहिले तर यात माझाच तोटा आहे कारण मूव्ही माफियांना तर स्वरा- तापसी यांसारख्या बऱ्याच आउटसायडर अभिनेत्री भेटतील ज्या म्हणतील, की फक्त कंगनालाच घराणेशाहीची समस्या आहे.’ असं वक्तव्य केलं होतं.

  • 9/15

    कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट बराच गाजला होता. मात्र यावर अभिनेत्री आलिया भट्टनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

  • 10/15

    यावरून भडकलेल्या कंगनानं आलियाला करण जोहरच्या हातातली ‘कठपुतली’ असं म्हटलं होतं. आलियाला स्वतःची कोणतीही मतं नाहीत असा आरोपही कंगनानं केला होता.

  • 11/15

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीनंतर कंगनानं ममता बॅनर्जी यांच्याबद्दल केलेलं ट्वीट खूपच वादग्रस्त ठरलं होतं. ज्यामुळे टीका झाली होती. तसेच तिचं ट्विटर हँडल देखील बॅन करण्यात आलं.

  • 12/15

    कंगनानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ‘माझी चूक झाली…तो रावण नाही…रावण एक महान राजा होता…त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश बनवला…पण ही रक्तपिपासू राक्षसीण आहे.’ या ट्वीटवरून कंगनाला टीकेचा सामना करावा लागला होता.

  • 13/15

    याशिवाय काही महिन्यांपूर्वीच कंगनाला पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर एका मुलाखतीत तिने देशाच्या स्वतंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

  • 14/15

    एका कार्यक्रमात बोलताना कंगनानं, ‘देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य, हे भीक म्हणून मिळालं होतं, मात्र २०१४ साली देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं’ असं वक्तव्य केलं होतं.

  • 15/15

    कंगनाच्या या वक्तव्यामुळे देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठली होती. तिला देण्यात आलेला पद्म पुरस्कारही काढून घेण्यात यावा अशी मागणीही झाली होती. (फोटो साभार- कंगना रणौत इन्स्टाग्राम)

TOPICS
कंगना रणौतKangana RanautमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kangana ranaut birthday know about her 5 most controversial statement mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.