-
ऑस्करच्या स्पर्धेत आजवर अनेक भारतीय चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. काहींनी स्वत:हून नामांकन मिळवली तर काहींनी देशातर्फे प्रतिनिधित्व केलं. यातील बहुतांश चित्रपटांची निर्मिती मराठी दिग्दर्शकांनी केली होती.
-
आशुतोष गोवारीकर (लगान) – २००१ साली आशुतोष गोवारीकर यांनी ‘लगान’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट ऑस्कर स्पर्धेतील अंतिम पाच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत पोहोचला होता.
-
फार जास्त कालावधी असलेले आणि विविध गाणी असलेला हा चित्रपट ऑस्करपर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. पण आशुतोष गोवारीकर यांच्या जबरदस्त दिग्दर्शनामुळे हे शक्य झालं.
-
संदिप सावंत (श्वास) – हिंदीत ‘लगान’नं इतिहास रचला आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती मराठीत केली ती ‘श्वास’ या चित्रपटानं. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदिप सावंत यानं केलं होतं.
-
ज्या काळात मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर जाऊ लागला होता. त्याच काळात ‘श्वास’ने ऑस्कर नामांकन मिळवून मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित केलं. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेतीसाठी पाठवण्यात आला होता.
अमोल पालेकर (पहेली) – २००५ साली प्रदर्शित झालेला ‘पहेली’ हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडला गेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पालेकर यांनी केलं होतं. -
या चित्रपटाला नामांकन मिळालं नाही, मात्र एका मराठी दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट ऑस्करसाठी जाणं हे बाब मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच कौतुकाची होती.
-
परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी) – परेश मोकाशी या दिग्दर्शकाने हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातून पदार्पण केलं आणि थेट ऑस्करवारी केली.
-
या चित्रपटात अगदी गंमतीशीर अंदाजात इतिहासातील पहिल्या चित्रपट निर्मितीचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
-
चैतन्य ताम्हाणे (कोर्ट) – राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी झाली होती. हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता.
-
‘कोर्ट’चे दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे याने केले होते. हा चित्रपट अत्यंत लो बजेट जरी असला तरी दर्जेदार संहिता आणि अफलातून अभिनयाच्या जोरावर याने ऑस्करवारी केली होती.
-
अमित मोसुरकर (न्यूटन) – २०१७ साली अमित मोसुरकर या दिग्दर्शकानं ‘न्यूटन’ हा हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.
-
‘न्यूटन’मध्ये अभिनेता राजकुमार राव याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.
-
या सर्व दिग्दर्शकांमध्ये संदिप सावंत, परेश मोकाशी आणि चैतन्य ताम्हाणे या तिघांनाही आपल्या पहिल्याच चित्रटात ऑस्करवारी गाठली.
-
या मराठी दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या या कलाकृती ऑस्करमध्ये जरी अपयशी ठरल्या तरी भारतीय चित्रपट इतिहासात त्या अजरामर झाल्या आहेत.
Oscar 2022 : भारतीय चित्रपटांना ऑस्करपर्यंत नेणारे ‘मराठी’ दिग्दर्शक
ऑस्करच्या स्पर्धेत आजवर अनेक भारतीय चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे.
Web Title: Oscar awards 2022 marathi director who took indian films to oscar nrp