-
राजेश खन्ना यांचा विवाह डिंपल कपाडियाशी झाला होता. विवाहित असताना राजेश खन्ना यांचे अफेअर टीना मुनीमसोबत होते. टीन मुनीम यांनी नंतर अनिल अंबानी यांच्योसोबत लग्न केलं. डिंपल कपाडिया यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी राजेश खन्नांचे घर सोडले. अशा अनेक कलाकारांच्या लग्नानंतर अफेअरच्या बातम्या आल्या. मात्र, त्यांच्या पत्नींनी घटस्फोट घेतला नाही. पाहुयात असेच काही कलाकार. -
अमिताभ बच्चन आणि जया भादुडी यांच्या लग्नानंतरही अमिताभ यांचं रेखासोबत अफेअर होतं, असं म्हटलं जातं.
-
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या चर्चेनंतरही गौरीने पतीची साथ सोडली नाही.
-
शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा हिलाही पती आणि अभिनेत्री रीना रॉय यांच्या अफेअरची माहिती होती. पतीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असूनही पूनमने कधीही पतीची साथ सोडली नाही.
-
एकेकाळी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. पती अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यातील जवळीक वाढत असल्याची माहिती जेव्हा ट्विंकल खन्नाला मिळाली, तेव्हा तिने याचा विरोध केला पण त्याची साथ सोडली नाही.
-
गोविंदाबद्दल असे म्हटले जाते की त्याचे अफेअर नीलमसोबत होते. पतीच्या अफेअरची बातमी मिळाल्यानंतरही सुनीता गोविंदासोबत राहिल्याचंही म्हटलं जातं.
-
सनी देओलचे नाव अमृता सिंगपासून ते डिंपल कपाडिया आणि रवीना टंडनपर्यंत जोडले गेले आहे. त्याची पत्नी पूजा देओल हिलाही त्याच्या अफेअरबद्दल माहिती होती. पूजाने सनी देओलला नक्कीच चेतावणी दिली होती परंतु तिने कधीही त्याच्यापासून घटस्फोट घेतला नाही.
-
आदित्य पांचोलीचे नाव अभिनेत्री कंगना राणौतसोबत जोडले गेले होते. त्यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. यानंतरही आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब पतीसोबतच राहिली.
-
Photos: Social Media
Photos: पतीच्या अफेअरबद्दल माहित असूनही ‘या’ अभिनेत्यांच्या पत्नींनी घेतला नाही घटस्फोट
अनेक कलाकारांच्या लग्नानंतर अफेअरच्या बातम्या आल्या. मात्र, त्यांच्या पत्नींनी घटस्फोट घेतला नाही. पाहुयात असेच काही कलाकार.
Web Title: Amitabh bachchan shahrukh khan akshay kumar to sunny deol these actors wife know about their affair but never gave divorce hrc