-
दिवसभराच्या ताण-तणावातून काही क्षण विरंगुळा मिळावा म्हणून आपण सर्वजण काही काळ टीव्ही पाहतो. छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या घराघरात प्रसिद्ध आहे.
-
या मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांची नावे, त्यांचे मालिकेतील नाव, कोणती मालिका किती वाजता झळकते यांसह विविध गोष्टींवर अनेकांची बारीक नजर असते.
-
छोट्या पडद्यावर म्हणजे टेलिव्हीजनवर झळकणाऱ्या कलाकारांनी लोकप्रियता एखाद्या बॉलिवूड सेलिब्रेटीप्रमाणे किंवा त्याहूनही जास्त असते.
-
गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे टेलिव्हीजनवरील मालिकेत काम करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
-
यात अभिनेता श्रेयस तळपदे, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्निल जोशी, उमेश कामत, प्रार्थना बेहेरे यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
-
पण मालिकेत काम करणाऱ्या या कलाकारांचे मानधन हे एखाद्या बॉलिवूड कलाकारांच्या तोडीस तोड असल्याचे समोर आलं आहे.
-
यानिमित्ताने सर्वाधिक कमाई करणाऱ्या काही छोट्या पडद्यावरील मराठी कलाकारांची नावे आणि त्यांचे मानधन आपण जाणून घेऊया. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
-
प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. श्रेयसने हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने लाखोंची मने जिंकली आहेत.
-
श्रेयस हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. तो प्रत्येक एपिसोडमागे ४० ते ४५ हजार रुपये मानधन आकारतो.
-
मराठी मनोरंजन क्षेत्रामधील लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशीला ओळखले जाते. स्वप्नील जोशी हा सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा एका भागासाठी ६० ते ७० हजार रुपये आकारतो.
-
अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘अजून ही बरसात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिची भूमिका प्रचंड चर्चेत होती. या मालिकेसाठी तिला चांगला मोबदला देण्यात आला होता.
-
तर याच मालिकेत उमेश कामतही झळकला होता. मुक्ता आणि उमेश हे दोघेही टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. मुक्ताप्रमाणए उमेशलाही या मालिकेसाठी चांगले मानधन देण्यात आले होते.
-
अभिनेते सचिन खेडेकर यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या मराठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. यासाठी प्रति एपिसोडमागे त्यांनी ५० लाख रुपये आकारले होते.
-
मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट हिरो अशी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ओळख सांगितली जाते. सिद्धार्थ चांदेकरने काही दिवसांपूर्वीच “सांग तू आहेस ना ?” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
-
यासाठी त्याला चांगले मानधन देण्यात आले होते. यामुळे त्याचे नाव हे मराठीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
श्रेयस तळपदे ते स्वप्नील जोशी, मराठी टीव्हीविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण?
सर्वाधिक कमाई करणाऱ्या काही छोट्या पडद्यावरील मराठी कलाकारांची नावे आणि त्यांचे मानधन आपण जाणून घेऊया.
Web Title: Shreyas talpade to swapnil joshi know highest paid celebrities of marathi tv serial nrp