Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor affairs with diffrent actress deepika padukone to katrina kaif mrj

आलियाच्या अगोदर ‘या’ ७ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होतं रणबीर कपूरचं अफेअर

आलिया भट्टला डेट करण्याआधी रणबीरचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

April 13, 2022 12:09 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' अर्थात रणबीर कपूर सध्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. मागच्या काही वर्षांपासून तो आलिया भट्टला डेट करत आहे.
    1/15

    बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात रणबीर कपूर सध्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. मागच्या काही वर्षांपासून तो आलिया भट्टला डेट करत आहे.

  • 2/15

    आलिया आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आलियाला डेट करण्याआधी रणबीरचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

  • 3/15

    एकेकाळी रणबीरचं नाव अभिनेत्री सोनम कपूरशी जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘सांवरिया’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.

  • 4/15

    या चित्रपटाच्या सेटवरच दोघांमधील जवळीक वाढली. रणबीर आणि सोनमनं एकमेकांना डेट काही काळ डेट केलं मात्र लवकरच दोघंही वेगळे झाले.

  • 5/15

    रणबीर कपूरचं सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नातं होतं दीपिका पदुकोणसोबतचं. एकेकाळी हे दोघंही बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जात होते.

  • 6/15

    काही रिपोर्ट्सनुसार रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एंट्री झाल्यानं दीपिका आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आणि दोघंही वेगळे झाले.

  • 7/15

    रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकमेकांना ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • 8/15

    या चित्रपटाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमातही पडले. दोघं एकमेकांशी लग्न करणार अशा चर्चा सुरू असतानाच अचानक त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

  • 9/15

    रणबीर कपूरचं नाव एकेकाळी अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबतही जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘रॉकस्टार’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

  • 10/15

    या चित्रपटाच्या सेटवरूनच रणबीर आणि नर्गिसनं एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर नर्गिससाठी रणबीरनं कतरिनाशी ब्रेकअप केल्याचंही बोललं जातं.

  • 11/15

    रणबीर कपूरनं प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील डेट केलं आहे. या दोघांनी ‘अंजाना अंजानी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

  • 12/15

    रणबीर आणि प्रियांकाचं नातं फार काळ टिकलं नाही. काही काळानंतर दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले.

  • 13/15

    दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची एकेकाळी बरीच चर्चा झाली होती. दोघांनी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं.

  • 14/15

    दोघांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा झाली होती मात्र रणबीर किंवा श्रुतीनं या नात्यावर कधीच कोणतंही भाष्य केलं नाही.

  • 15/15

    बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी रणबीर कपूरचं अवंतिका मालिकसोबत अफेअर होतं. मात्र नंतर काही कारणानं दोघांचंही ब्रेकअप झालं. (फोटो साभार- सोशल मीडिया)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor affairs with diffrent actress deepika padukone to katrina kaif mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.