-

प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने नवीन विक्रम रचले आहेत.
-
‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतातील चौथा चित्रपट ठरला आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव सामिल झाले आहे.
-
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात कमाईच्या बाबतीत नवा विक्रम रचला आहे.
-
हिंदी भाषेमध्ये डब झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
-
. यश आणि संजय दत्तचा हा चित्रपट लॉकडाऊननंतर सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट आहे.
-
तसेच ओडिसामध्ये १० कोटी तर केरळमध्ये ५० कोटी रुपये कमावून या चित्रपटाने प्रादेशिक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
-
अॅडव्हान्स बुकिंगमध्येही ‘केजीएफ चॅप्टर २’ सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
या दाक्षिणात्य चित्रपटामधील कलाकार देखील चित्रपटाला मिळालेलं यश सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो – सगळे फोटो फाईल)
Photos : KGF 2 चित्रपटाने रचले सात नवीन विक्रम, अजूनही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी
‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत. तरीही हा चित्रपट अजूनही बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने नवीन विक्रम रचले आहेत.
Web Title: Kgf chapter 2 record break box office collection and film has become biggest opener in the history of movies kmd