-
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.
-
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
-
‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहे.
-
नुकतंच या चित्रपटातील काही पडद्यामागचे फोटो समोर आले आहेत.
-
हे सर्व फोटो ‘धर्मवीर’ या चित्रपटातील शूटींगदरम्यानचे आहे.
-
यातील काही फोटो हे ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहेत.
-
विशेष म्हणजे या सर्व फोटोत प्रसाद ओक हा हुबेहुब आनंद दिघे यांच्याप्रमाणे दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.
-
‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणामधील behind the scene फोटो आता बिनधास्त पोस्ट करू शकतो! लूक रिविल होई पर्यंत बरीच काळजी घेतल्यामुळे प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या भूमिकेमध्ये पाहून तुमच्या ज्या कमालीच्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याच साठी केला होता अट्टाहास!, असे त्याने म्हटले आहे.
-
त्याच्या या पोस्टखाली अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. तसेच ही पोस्टही व्हायरल होत आहे.
-
दरम्यान ‘या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली’, असा खुलासा प्रसाद ओकने एका मुलाखतीत केला होता.
-
“धर्मवीर या संपूर्ण चित्रपटाला दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे, असेही मी मानतो. त्याशिवाय हे शक्य झाले नसते”, असेही प्रसादने सांगितले होते.
-
“मी जेव्हा ही भूमिका साकारत होतो, तेव्हा तासनतास व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्यांचा फोटो बघत बसायचो. कारण त्या माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच गंमत होती आणि एक अभिनेता म्हणून त्यांचे डोळे तशाच प्रकारे साकारणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी होती”, असेही प्रसाद म्हणाला.
-
“मी अनेक तास त्यांच्या फोटोकडे टक लावून बघायचो. कोण जाणे? काय माहिती, पण ते सतत माझ्या आसपास असायचे आणि नकळत ते माझ्यात यायचे”, असेही त्याने म्हटले.
-
“आपण अनेकदा पुस्तकात परग्राह्य प्रवेश असे वाचले आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मी स्वत: ते अनुभवले आहे. हा एक प्रचंड विलक्षण अनुभव होता”, असेही तो म्हणाला.
-
येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (फोटो क्रेडीट – धर्मवीर/इन्स्टाग्राम)
‘धर्मवीर’ चित्रपटातील पडद्यामागचे खास फोटो समोर, दिघे साहेबांच्या भूमिकेतील प्रसाद ओकचा हुबेहुब लूक पाहिलात का?
हे सर्व फोटो ‘धर्मवीर’ या चित्रपटातील शूटींगदरम्यानचे आहे.
Web Title: Dharmaveer anand dighe role prasad oak behind the scene special photos viral nrp