-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख व्यक्तींना राजभवन येथे ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्ट’तर्फे देण्यात आलेल्या या पुरस्कारांचे वितरण ३ मे रोजी करण्यात आले.
-
अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
-
‘डीआयडी लिटल मास्टर’ या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेला आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा नृत्य दिग्दर्शक धर्मेश येलांडे याचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
-
‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमधून अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता प्रतीक गांधी याला देखील ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
-
‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसरचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
-
याशिवाय युवा गायक अमित त्रिवेदी, पत्रकार फेय डिसूझा,फॅशन डिझायनर दिव्या शेठ यांसह अनेकांना ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
Photos : ‘स्कॅम’मधील हर्षद मेहता ते ‘सैराट’ फेम आकाश… विविध क्षेत्रातील नामांकितांचा ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरव
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख व्यक्तींना राजभवन येथे ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Web Title: Actress prajkta mali actor pratik gandhi akash thosar choreographer dharmesh yelande awarded with kamala rising star award from governor of maharashtra bhagat singh koshyari kak