-
“असा एकही दिवस नसतो की तुझी आठवण येत नाही. पण आज मदर्स डे निमित्त सगळ्यांनी त्यांच्या आईसोबत शेअर केलेले फोटो पाहून तुझी खूपच आठवण येत आहे.” असं म्हणत अक्षय कुमारने आईसोबतचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
नववधू आलिया भट्टने आई आणि सासूसोबत फोटो शेअर करत सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
स्टारकिड जान्हवी कपूरने मातृदिनानिमित्त आई श्रीदेवी यांच्यासोबतचा एक जुना फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
-
करीना कपूरने मातृदिनानिमित्त दोन्ही मुलांसोबतचा गोड फोटो शेअर केला आहे.
-
कतरिना कैफने आईसोबतचा एक सुंदर फोटो मातृदिनानिमित्त शेअर केला.
-
तसेच कतरिनाने सासूला देखील फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
सोहा अली खानने देखील मातृदिनानिमित्त आईला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
विकी कौशलने आपल्या लग्नातील आईसोबतचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तसेच कतरिनाची आई म्हणजेच त्याच्या सासूसोबतचा फोटो देखील या खास दिनानिमित्त त्याने सोशल मीडियावर शेअर केला. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Mothers Day 2022 : आलिया भट्ट ते कतरिना कैफ, बॉलिवूडकरांनी असा साजरा केला मदर्स डे
अक्षय कुमारपासून ते अगदी आलिया भट्टपर्यंत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आईसोबत फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Title: Mothers day 2022 bollywood actors celebrate mothers day and shares photos with mother on social media kmd