-
बॉबी देओलची ‘आश्रम ३’ वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या वेबसीरिजमध्ये बॉबीने साकारलेली बाबा निरालाची भूमिका तर प्रचंड गाजली.
-
आता त्याच्या याच भूमिकेवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
-
हे मीम्स पाहून बहुदा बॉबीला देखील हसू आवरणार नाही.
-
‘आश्रम’ वेबसीरिजचा चाहतावर्गही मोठा आहे.
-
या वेबसीरिजचे दोन भाग सुपरहिट ठरल्यानंतर तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते.
-
राजकारण, ड्रग्स प्रकरण या सगळ्या विषयांमध्ये गुंतलेली ही वेबसीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.
-
प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजने बॉबीच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
-
बॉबी बऱ्याच काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर होता. त्याच्याकडे फारसे चित्रपट किंवा इतर कोणतेच प्रोजेक्ट नव्हते.
-
पण ‘आश्रम’ मधून कलाकार म्हणून आपण उत्तम आहोतच हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं.
-
त्रिधा चौधरी, अदिती सुधीर पोहनकर आणि तुषार पांडे यांनी ‘आश्रम’ सीरिजमध्ये काम केलं आहे.
-
आता या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये काय दाखवलं जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
-
काशीपूर येथील एका काल्पनिक कथेवर या सीरिजचं कथानक आधारित आहे.
-
या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताचा ग्लॅमरस अंदाजही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
एम एक्स प्लेअरची ही सीरिज पुढील महिन्यात प्रदर्शित होईल. (फोटो – सगळे फाईल फोटो)
Photos : ‘आश्रम’च्या बाबा निरालावर मीम्सचा पाऊस, बॉबी देओललाही आवरणार नाही हसू
बॉबी देओलच्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. या वेबसीरिजमध्ये बॉबीने साकारलेली बाबा निराला ही भूमिका तर प्रचंड गाजली. आता या त्याच्या भूमिकेवरून भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Memes viral on baba nirala character of ashram web series actor bobby deol will also smile kmd