-
अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिच्या दोन मराठी चित्रपटांची नुकतीच घोषणा केली आहे.
-
हृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
-
विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट येत्या जुलै महिन्यातच प्रदर्शित होतील.
-
हृताचा पती प्रतिक शहाने सोशल मीडियाद्वारे नव्या वाटचालीसाठी आपल्या बायकोला मन भरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
-
हृता देखील तिच्या चित्रपटांसाठी फारच उत्सुक आहे.
-
तसेच हृताने देखील एक खास पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की “माझ्या या सुंदर प्रवासामध्ये सगळ्यात आवडत्या व्यक्तीची मला साथ लाभत आहे.”
-
हृताची ही पोस्ट पाहून प्रतिक तिला तिच्या प्रत्येक कामात साथ देतो हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटात हृता वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.
-
‘अनन्या’ २२ जुलैला तर ‘टाईमपास ३’ २९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होईल. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : लग्नानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळेचं नशिब फळफळलं, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी
अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. लग्नानंतर ती पुन्हा एकदा कामाला लागली आहे. येत्या जुलै महिन्यात हृताचे एक नव्हे तर दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. इन्स्टाग्रामद्वारे हृताने तिच्या ‘टाईमपास ३’ आणि ‘अनन्या’ चित्रपटाचे टीझर शेअर करत याबाबत माहिती दिली.
Web Title: Actress hruta durgule back to back two marathi movie timepass 3 ananya release in july kmd