-
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहचली. स्नेहलताचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने साकारलेली ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका तर प्रचंड गाजली.
-
आजही तिला याच भूमिकेमुळे प्रेक्षक ओळखतात.
-
ऐतिहासिक भूमिका साकारत असताना तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. पण आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
-
तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले.
-
पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये स्नेहलताने हे खास फोटोशूट केलं होतं.
-
मात्र ट्रोलर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आता तिने एक खास पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
-
“तुमच्यावरील संस्कार तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात.” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
कौतुकास्पद गोष्ट म्हणजे स्नेहलताने ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आपल्या नव्या लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहचली. स्नेहलताचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने साकारलेली ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका तर प्रचंड गाजली. पण आता स्नेहलता तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: Marathi actress snehlata vasaikar share her bold photos on instagrama kmd