-
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेता करण ग्रोवर विवाहबंधनात अडकला आहे.
-
करणने त्याची गर्लफ्रेंड पॉपी जब्बलबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
करण आणि पॉपीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे लग्नातील फोटो शेअर करत सगळ्यांनाचा आनंदाची बातमी दिली.
-
करण-पॉपी लग्नाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये अगदी खुलून दिसत आहेत.
-
करण-पॉपीने हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारी ३१ मे रोजी लग्न केलं.
-
कुटुंबिय आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये करण-पॉपीचा विवाहसोहळा पार पडला.
-
बुधवारी या दोघांनी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.
-
गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत करण-पॉपीने अचानक लग्न केल्याने सगळ्यांनाच सुखद धक्का बसला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
हिंदी मालिकांमुळे नावारुपाला आलेला अभिनेता करण ग्रोवर विवाहबंधनात अडकला आहे. करणने अभिनेत्री पॉपी जब्बलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मंगळवारी ३१ मे रोजी करण-पॉपीचा विवाहसोहळा पार पडला. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Web Title: Karan v grover poppy jibbal wedding album beautiful pictures viral on social media kmd