-
सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग झाल्याचं समोर आलं आहे.
-
अभिनेते अनुपम खेर यांनी महिमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्तनाच्या कर्करोगबद्दल सांगताना दिसत आहे.
-
महिमाचा या व्हिडीओमधील लूक पाहून तिला ओळखणंही कठीण झालं.
-
पण मोठ्या हिंमतीने तिने या प्रसंगाला तोंड दिलं.
-
महिमा चौधरीची केमोथेरपी झाली आहे. त्यामुळेच तिचं टक्कल पडलं आहे.
-
व्हिडीओमध्ये महिमाने तिला स्तनाचा कर्करोग कधी आणि कसा झाला याविषयी सांगितले आहे.
-
कर्करोगावर उपचार झाल्यामुळे महिमा आनंदी आहे.
-
महिमाला तिचे लांबसडक केस देखील काही दिवसांनी परत मिळतील.
-
महिमाने १९९७ मध्ये शाहरुख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : महिमा चौधरीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल अन् बदलता लूक पाहून अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण
सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी तिचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती आपल्याला झालेल्या कर्करोगाविषयी बोलताना दिसत आहे. कर्करोगाशी सामना करत असताना तिचा लूक कसा बदलत गेला हे आपण आज पाहणार आहोत.
Web Title: Actress mahima choudhary suffer from breast cancer and her look viral on social media kmd