-
‘बालक पालक’, ‘टाइमपास’ चित्रपटांमुळे अभिनेता प्रथमेश परब नावारुपाला आला.
-
मध्यंतरीच्या काळात प्रथमेश फारसा रुपेरी पडद्यावर दिसला नाही.
-
पण आता त्याचं नशिब उजळलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
-
प्रथमेशने चक्क हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
-
व्हॅनिटी व्हॅनबरोबर फोटो शेअर करत बॉलिवूड कॉलिंग असं म्हणत त्याने फोटो शेअर केला आहे.
-
इतकंत नव्हे तर वेबविश्वातही त्याने पदार्पण केलं आहे.
-
हॉट स्टारवरील वेबसीरिज ‘ताजा खबर’मध्ये त्याने श्रिया पिळगावकर या अभिनेत्रीबरोबर काम केलं आहे.
-
तसेच त्याचा ‘अन्य’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
प्रथमेशने कलाक्षेत्रात खरंच उंच भरारी घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही. (फोटो – इन्स्टाग्राम)
‘टाइमपास’मधल्या ‘दगडू’ची उंच भरारी, मराठीसह बॉलिवूड, हिंदी वेबसीरिजमध्ये करतोय काम
‘टाइमपास’ चित्रपटामुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेश सध्या फक्त मराठी चित्रपटच नव्हे तर हिंदी वेबसीरिज आणि चित्रपटही करत आहे. शिवाय त्याच्या हाती काही मराठी चित्रपट देखील आहेत.
Web Title: Marathi actor prathamesh parab new journey started from hindi webseries and he announce new hindi marathi movie kmd