• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. no movies no series find out what aishwarya rai bachchan does for a living pvp

Photos : कोणताही चित्रपट नाही, ना कोणती सिरीज; जाणून घ्या कमाईसाठी काय करते ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नाही, तर तिच्या उपजीविकेचा मार्ग कोणता हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.

June 13, 2022 21:15 IST
Follow Us
  • aishwarya rai earnings
    1/22

    ऐश्वर्या राय बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. चाहते अनेक दिवसांपासून ऐश्वर्याला चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 2/22

    तथापि, ऐश्वर्या तिच्या सार्वजनिक जीवनात खूप सक्रिय आहे आणि सर्व पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये ती नेत्रदीपक शैलीत दिसते.

  • 3/22

    ऐश्वर्या बर्‍याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, परंतु याचाही तिच्या भव्य जीवनशैलीवर परिणाम झालेला नाही.

  • 4/22

    ऐश्वर्या सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नाही, तर तिच्या उपजीविकेचा मार्ग कोणता हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.

  • 5/22

    ऐश्वर्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमधून पैसे कमावते.

  • 6/22

    जीक्यूच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय जवळपास ७७६ कोटींची मालकीण आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच ऐश्वर्या एक स्मार्ट बिझनेसवुमन देखील आहे.

  • 7/22

    ऐश्वर्या राय ‘अ‍ॅम्बी’ नावाच्या कंपनीत गुंतवणूकदार आहे. ही एक पर्यावरणप्रेमी स्टार्टअप कंपनी आहे. बेंगळुरूस्थित या स्टार्टअपमध्ये तिने १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

  • 8/22

    पुढे, इकॉनॉमिक टाईम्सच्या म्हणण्यानुसार, हेल्थकेअर कंपनी पॉसिबलने आपल्या मोठ्या फंडिंग फेरीचा भाग म्हणून राय बच्चन यांच्याकडून ५ कोटी रुपये निधी उभारली.

  • 9/22

    ऐश्वर्या राय बच्चन विलासी जीवन जगते. ऐश्वर्याच्या वैभवशाली जीवनशैलीमध्ये आंतरराष्ट्रीय सुट्टीसह तिच्या अनेक महागड्या छंदांचा समावेश आहे.

  • 10/22

    ऐश्वर्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ती प्रत्येक चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये आकारते.

  • 11/22

    ऐश्वर्या राय बच्चन ही केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे.

  • 12/22

    ऐश्वर्या वर्षानुवर्षे, लॉरिअल आणि स्विस लक्झरी वॉच लाँगिनेसशी संबंधित आहे.

  • 13/22

    ब्रँड एंडोर्समेंटमधून ऐश्वर्याची कमाईही लक्षणीय वाढते. ही अभिनेत्री ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला सुमारे ८० ते ९० कोटी रुपये कमावते.

  • 14/22

    गेल्या काही वर्षांत ती, स्टार लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, कोका-कोला, लोढा ग्रुप, पेप्सी, टायटन वॉचेस, लॅक्मे कॉस्मेटिक्स, कॅसिओ पेजर, फिलिप्स, पामोलिव्ह, कॅडबरी, फुजी फिल्म्स, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या अनेक ब्रँडचा चेहरा राहिली आहे.

  • 15/22

    डी बीयर्स डायमंड्स, एलिगन्स आणि टीटीके प्रेस्टीज ग्रुप यांचाही या यादीत समावेश आहे.

  • 16/22

    ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे आई-वडील अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत जलसा नावाच्या बंगल्यात राहतात.

  • 17/22

    जलसा मुंबईतील जुहू येथे आहे आणि मिड-डेच्या रिपोर्टनुसार त्याची किंमत ११२ कोटी रुपये आहे. याशिवाय, दोघांकडे दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमधील सेंच्युरी फॉल्स येथे एक भव्य व्हिला देखील आहे.

  • 18/22

    ऐश्वर्या राय बच्चनकडे एक शक्तिशाली रिअल-इस्टेट पोर्टफोलिओ आहे आणि तिच्याकडे मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या सर्वात आलिशान ठिकाणी २१ कोटी रुपयांचे आणखी एक लक्झरी अपार्टमेंट आहे.

  • 19/22

    ५,५०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे अपार्टमेंट ३८ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने विकत घेण्यात आले.

  • 20/22

    ऐश्वर्या राय बच्चनला आलिशान वाहनांचीही खूप आवड आहे. ऐश्वर्याच्या गॅरेजमध्ये अनेक मौल्यवान वाहने आहेत.

  • 21/22

    ऐश्वर्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ७.९५ कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट, १.६० कोटी रुपयांची मर्सिडीज बेंज एस३५०डी कूप, १.५८ कोटी रुपयांची ऑडी ए८एल,लेक्सस एलएक्स ५७० आणि मर्सिडीज- बेंज एस०० यांचा समावेश आहे.

  • 22/22

    सर्व फोटो : इंस्टाग्राम/@aishwaryaraibachchan_arb

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: No movies no series find out what aishwarya rai bachchan does for a living pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.