Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tu chal pudha zee marathi upcoming tv serial ankush chaudhari wife deepa parab lead role first look viral photos sdn

Photos: झी मराठीच्या ‘या’ मालिकेत अंकुश चौधरीची पत्नी साकारणार महत्त्वाची भूमिका; फर्स्ट लूकचे फोटो पाहा

नुकतेच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

July 13, 2022 11:08 IST
Follow Us
  • Deepa Parab Chaudhari New Serial Zee Marathi
    1/15

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/15

    दीपा परबसुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 3/15

    विविध भूमिका साकारून दीपाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

  • 4/15

    ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावतरी भूमिकेत दिसणार आहे.

  • 5/15

    दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले पण बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 6/15

    झी मराठी वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’ मध्ये दीपा ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

  • 7/15

    नुकतेच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

  • 8/15

    या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची.

  • 9/15

    एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा या प्रोमो मधून झळकते.

  • 10/15

    या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसतेय.

  • 11/15

    ही मालिका १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

  • 12/15

    आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब म्हणाली, बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परातल्याची भावना आहे.

  • 13/15

    ‘तू चाल पुढं’ या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून ही कथा गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.

  • 14/15

    बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते.

  • 15/15

    या मालिकेतील अश्विनी ही प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे. (सर्व फोटो सौजन्य : दीपा परब / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tu chal pudha zee marathi upcoming tv serial ankush chaudhari wife deepa parab lead role first look viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.