-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत.
-
या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता गौरव मोरे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे प्रकाशझोतात आलेला गौरव लवकरच एका मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.
-
‘हवाहवाई’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
-
दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या या चित्रपटातून मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
-
महेश यांचा ‘वन रुम किचन’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
-
आता यामध्ये गौरव नेमकी कोणती भूमिका साकारणार हे लवकरच स्पष्ट होईल.
-
येत्या ७ ऑक्टोबरला ‘हवाहवाई’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या हाती नवा मराठी चित्रपट, वाचा कधी होणार प्रदर्शित?
अभिनेता गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आला. आता तो आणखी एका मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. गौरवच्या याच चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.
Web Title: Maharashtrachi hasyajatra actor gaurav more marathi movie hawahawai release soon see details kmd