• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali bendre shocking reveal about body shaming in 90 s know what she said mrj

“माझ्या शरीरावरून…” बॉडी शेमिंगबाबत सोनाली बेंद्रेनं केला धक्कादायक खुलासा

बॉडी शेमिंगबाबत सोनाली बेंद्रेनं धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: August 10, 2022 09:28 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
    1/24

    बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

  • 2/24

    ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रे ओळखली जाते.

  • 3/24

    सोनाली बेंद्रेला २०१८ मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं.

  • 4/24

    मात्र कर्करोगाशी झुंज देत सोनालीने त्यावर यशस्वीपणे मातही केली.

  • 5/24

    या काळात ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांमध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती करतानाही दिसली होती.

  • 6/24

    सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये ‘सरफरोश’, ‘जख्म’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘डुप्लीकेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

  • 7/24

    ९० च्या दशकात आपल्या फॅशन आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनालीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.

  • 8/24

    अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीनं ९० च्या दशकातील बॉडी शेमिंगच्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे.

  • 9/24

    बॉडी शेमिंगवर स्पष्ट मत मांडताना सोनालीने तिला बॉलिवूडमध्ये आलेला अनुभव शेअर केला.

  • 10/24

    ९० च्या दशकात सडपातळ असणाऱ्या अभिनेत्रींना किंवा मुलींना सुंदर म्हटलं जात नव्हतं असं सोनालीनं या मुलाखतीत सांगितलं.

  • 11/24

    सोनाली म्हणाली, “मला अनेकदा माझ्या सडपातळ शरीरयष्टीवरून हिणवलं जायचं. कारण त्या काळात बारीक असणं ही सौंदर्याची व्याख्या नव्हती.”

  • 12/24

    “मी बारीक होते त्यामुळे, तू कर्व्ही नाहीस म्हणून तू सुंदर नाहीस असंही मला अनेकदा सांगण्यात आलं.” असा खुलासा सोनालीनं केला.

  • 13/24

    बॉडी शेमिंगबद्दल सोनाली म्हणते, “आजही समाजात बॉडी शेमिंग होताना दिसतं पण हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं.”

  • 14/24

    “विशेषतः लहान वयातील मुली आजकाल डाएटिंग करताना दिसतात. पण हे त्यांच्यासाठी चांगलं नाही.” असंही सोनाली म्हणाली.

  • 15/24

    याशिवाय या मुलाखतीत सोनालीनं तिच्या कर्करोगाच्या लढाईवरही भाष्य केलं.

  • 16/24

    ती म्हणाली, “मला स्टेज ४ च्या कर्करोगाचं निदान झालं होतं आणि यातून जगण्याची शक्यता फक्त ३० टक्के असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं.”

  • 17/24

    कर्करोगाच्या लढाईबद्दल सोनाली पुढे सांगते, “मी यातून ठीक झाल्यावर फोटोशूट केलं होतं ज्याची खूप चर्चा झाली होती.”

  • 18/24

    “ते शूट केलं तेव्हा मी शस्त्रक्रियेचा व्रण लोकांना दाखवायला घाबरत होते आणि ही भीती घालवण्यासाठी मी ते फोटोशूट केलं होतं.” असंही सोनालीने सांगितलं.

  • 19/24

    आपल्या या प्रवासाबद्दल सोनाली म्हणते, “जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा ती तुम्ही तिथेच संपवायला हवी, यामुळे तुम्ही त्या दुःखातून लवकर बाहेर पडता.”

  • 20/24

    दरम्यान कर्करोगावर मात केल्यानंतर सोनालीनं मोठ्या पडद्यावर पुन्हा कमबॅक केलं आहे.

  • 21/24

    तिची ‘द ब्रोकन न्यूज’ वेब सीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली आहे.

  • 22/24

    याशिवाय सोनाली काही टीव्ही शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेतही दिसली होती.

  • 23/24

    ( सर्व फोटो- सोनाली बेंद्रे इन्स्टाग्राम )

  • 24/24

    (आणखी पाहा- Photos : बीच, रोमान्स आणि थायलंड, कार्तिकी गायकवाडच्या ट्रीपची सर्वत्र चर्चा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodसोनाली बेंद्रेSonali Bendre

Web Title: Sonali bendre shocking reveal about body shaming in 90 s know what she said mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.