Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. सोनालीचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरू येथील ‘केंद्रीय विद्यालय’ येथे झाले, नंतर तिने मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. मॉडेलिंग दरम्यानच सोनालीला १९९४ मध्ये पहिल्या चित्रपटाची ऑफर आली आणि तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘आग’ होते. या चित्रपटात गोविंदा आणि शिल्पा शेट्टी यांनीही काम केले होते. या चित्रपटातील सोनालीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ज्यासाठी तिला ‘न्यू फेम ऑफ द इयर फिल्मफेअर’ आणि ‘स्टार स्क्रीन मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर’ हे पुरस्कारही देखील मिळाले. १९९६ मध्ये आलेल्या ‘दिलजले’ या चित्रपटाने तीला भरपूर लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अजय देवगणही मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिने कादर खान, सुनील शेट्टी, शक्ती कपूरबरोबर ‘भाई’ आमिर खानचा ‘सरफरोश’, शाहरुख खानबरोबर ‘डुप्लिकेट’ सारखे चित्रपट केले. करिश्मा कपूर आणि सैफ अली खानसह ‘हम साथ साथ है’ आणि ‘अनाहत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मध्यंतरी सोनालीला कॅन्सरदेखील झाला होता ज्याच्यावर मात करून तिने पुन्हा ओटीटीच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात कमबॅक केला आहे.Read More
Sonali Bendre
“सरफरोशला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अचानक मला खूप म्हातारं…”, बॉलीवूडमधील वारशाबद्दल अभिनेत्री सोनाली बेंद्रे झाली व्यक्त

१९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Sonali Bendre fan committed suicide and one wrote a letter with blood
9 Photos
एका चाहत्याने दिला जीव तर…, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाली, “रक्ताने पत्र…”

ही अभिनेत्री ९०च्या काळापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.

Sonali Bendre wreaked havoc in Marathi look, looked very beautiful in green silk saree
7 Photos
नाकात नथ, गळ्यात ठुशी! हिरव्या जरीच्या साडीत सोनाली बेंद्रेचा अस्सल मराठमोळा लूक, पाहा PHOTO

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर करत असते.…

Baipan bhari deva director kedar shinde sonali bendre
२००४नंतर पहिल्यांदाच अभिनेत्री सोनाली बेंद्रेला भेटल्यानंतर केदार शिंदेंची होती ‘ही’ रिअ‍ॅक्शन; म्हणाले, “मोठेपणा…”

केदार शिंदे सोनाली बेंद्रे विषयी काय म्हणाले? वाचा…

baipan bhari deva actress perform mangalagaur on indias best dancer show
“नाच ग घुमा”, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’ची टीम खेळली मंगळागौर, व्हिडीओ व्हायरल

हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्री खेळल्या मंगळागौर, सोनाली बेंद्रेही थिरकली, व्हिडीओ व्हायरल

bollywood Actress Sonali Bendre
Video: अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाली, “खरंच…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाविषयी अभिनेत्री सोनाली बेंद्रे काय म्हणाली? पाहा

Abhishek bachchan sonali bendre
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन करत होता प्रॉडक्शन बॉयचं काम; किस्सा सांगत म्हणाली…

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन ‘कोणत्या’ चित्रपटासाठी प्रॉडक्शन बॉयचं करत होता काम?

Sonali-Bendre
सोनाली बेंद्रेवर जडलेला पाकिस्तानी क्रिकेटपटूचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, म्हणालेला “तिने नकार दिल्यास…”

भारत-पाकिस्तानच्या एका सीरिजदरम्यानही त्यांची भेट झाली होती. पण…

underworld in bollywood sonali bendre
“बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचं वर्चस्व आणि…”, अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा खुलासा

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यामध्ये नेमकं काय कनेक्शन होतं? याबाबत अभिनेत्री सोनाली बेंद्रेने खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या