-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची जोडी कायमच चर्चेत असते.
-
विराट आणि अनुष्काला मुंबईविषयी खास आकर्षण आहे.
-
नुकतंच त्या दोघांनी चक्क स्कूटीवरुन मुंबईत भटकंती केली आहे.
-
त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या दोघांना कोणीही ओळखू नये म्हणून त्यांनी हेल्मेटचा आधारही घेतल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
-
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सोमवारी (२२ ऑगस्ट) आशिया चषकासाठी रवाना होणार आहे.
-
इंग्लंडविरुद्धच्या मालिका सामन्यानंतर विराट कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
-
यादरम्यान त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये सुट्ट्याही एन्जॉय केल्या होत्या. त्यानंतर आता विराट कोहली हा मुंबईत त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
-
नुकतंच विराट-अनुष्काचे मुंबईत फिरतानाचे काही फोटो समोर आले आहेत.
-
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही मुंबईत एका शूटनंतर एकत्र फिरायला गेले होते.
-
त्या दोघांनीही काळ्या रंगाचे हेल्मेट घातल्याने कोणालाही त्यांना ओळखणे आले नाही. पण त्यांच्या चाहत्यांनी त्या दोघांनाही ओळखले.
-
यावेळी विराट हा स्कूटी चालवत असून अनुष्का शर्मा ही त्याच्या मागे बसली आहे.
-
यावेळी अनुष्काने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. तर कोहलीने हिरव्या रंगाचा टीशर्ट, काळ्या रंगाची जिन्स आणि पांढरे शूज परिधान केले आहे.
-
दरम्यान विराट कोहली हा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.
-
तर अनुष्का शर्मा ही चार वर्षांनंतर चकदा एक्सप्रेसमधून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही फार उत्सुक असल्याचे दिसत आहेत.
प्रसिद्ध सेलिब्रेटी कपलने स्कूटीवरुन केली मुंबईची भटकंती, फोटो व्हायरल
त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Web Title: Virat kohli and anushka sharma ride a scooter in mumbai photos viral nrp