-

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर गेल्या काही दिवसांपासून ‘आरआरआर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-
नुकतंच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्युनिअर एनटीआरचे आणि त्याच्या कामाचे कौतुक केले आहे.
-
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर आणि ‘रामोजी फिल्मसिटी’चे रामोजी राव यांची भेट घेतली.
-
या भेटीनंतर अमित शाहांनी ट्वीट करत एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या भेटीचे फोटोही पोस्ट केले आहेत.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांची ही भेट हैदराबादमध्ये झाली.
-
यावेळी त्या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. दाक्षिणात्य सिनेसृष्टी, चित्रपट, कलाकार यांसह विविध विषयांवर अमित शाहांनी ज्युनिअर एनटीआरसोबत संवाद साधला.
-
अमित शाहांनी या भेटीचे फोटो शेअर करताना त्याला छान कॅप्सनही दिले आहे. त्यात त्यांनी ज्युनिअर एनटीआरचे कौतुक केले आहे.
-
“तेलुगू सिनेसृष्टीतील एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आणि तेलुगू चित्रपटसृष्टीचा हिरा असलेल्या ज्युनिअर एनटीआरची हैदराबाद येथे भेट घेतली. त्याच्यासोबत छान संवादही साधला”, असे अमित शाहांनी म्हटले आहे.
-
तर रामोजी राव यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना ते म्हणाले की, ‘श्री रामोजी राव यांचा जीवन प्रवास अतुलनीय आहे. विविध चित्रपट उद्योग आणि माध्यमांसंबंधित लाखो लोकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. आज मी त्यांची हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेतली.’
-
अमित शाह आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
अमित शहा हे केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर ज्युनियर एनटीआर हा चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकार आहे. या दोन दिग्गजांच्या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
या फोटोला ५० हजाराहून अधिक लाइक्स पाहायला मिळत आहे. तर १२ हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्वीट केला आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देतानाही दिसत आहे.
-
तर ज्युनिअर एनटीआरनेही अमित शाहांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
-
सर्व फोटो – (अमित शाह, ज्युनिअर एनटीआर/ ट्विटर)
अमित शाहांच्या भेटीनंतर ज्युनिअर एनटीआरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देतानाही दिसत आहे.
Web Title: Home minister amit shah meets jr ntr calls him gem of telugu cinema actor reply nrp