-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे.
-
सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे.
-
यानंतर आता सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक समोर आली आहे. सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिने नुकतंच सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर केला आहे.
-
सोनम कपूरची बहिण रिया कपूरने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बाळाचे तीन फोटो पोस्ट केले आहेत.
-
यात सोनमचे बाळ, रिया कपूर आणि तिची आई सुनिता कपूर पाहायला मिळत आहेत. यात बाळाचा चेहरा दिसू नये म्हणून तिने इमोजीचा वापर केला आहे.
-
त्यामुळे सोनम कपूरच्या बाळाचा चेहरा पाहायला मिळत नाही.
-
“रिया मावशी ही आज अजिबातच ठीक नाही. तू खूपच गोंडस आहेस आणि हा क्षण फारच काल्पनिक आहे. असे रियाने हा फोटो पोस्ट करताना म्हटले होते.
-
त्यापुढे ती म्हणाली, “तुझी धाडसी आई सोनम कपूर, प्रेमळ बाबा आनंद अहुजा आणि आजी सुनिता कपूर यांच्याकडून खूप खूप प्रेम.”
-
सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.
सोनम कपूरच्या मुलाची पहिली झलक, बाळाचे खास फोटो पाहिलात का?
सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिने नुकतंच सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर केला आहे.
Web Title: Actress sonam kapoor baby first look rhea kapoor shares first glimpse baby boy photos viral nrp