-
सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांचा विक्रम वेधा लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट साऊथच्या विक्रम वेधा या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. गंमत म्हणजे दोन्ही चित्रपटांच्या नावासोबतच दोघांचे दिग्दर्शकही एकच आहेत.
-
शाहिद कपूरचा जर्सी हा तेलगू चित्रपट जर्सीचा रिमेक होता. या दोघांचे दिग्दर्शन गौतम नायडू तिन्नूरी यांनी केले होते.
-
शाहिद कपूरचा कबीर सिंग हा विजय देवरकोंडाच्या अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक होता. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.
-
अक्षयचा लक्ष्मी हा तमिळ चित्रपट कांचनाचा रिमेक होता. या दोघांचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले होते.
-
भागमतीचा हिंदी रिमेक दुर्गामती हा देखील जी अशोक यांनीच दिग्दर्शित केला होता
-
रमाय्या वस्तावैय्या, नुववोस्तानांते नेनोदंतना या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील प्रभुदेवाने दिग्दर्शित केला होता.
-
सलमान खानचा बॉडीगार्ड हा चित्रपट नयनताराच्या बॉडीगार्डचा रिमेक होता. या दोघांचे दिग्दर्शन सिद्दीकी इस्माईल यांनी केले होते.
-
आमिर खानच्या गझनी चित्रपटाने बॉक्स ऑफिसरवर मोठे यश मिळवले. हा चित्रपट गझनी या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन . ए.आर. मुरुगदास यांनी केले होते.
Photos : या दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी स्वत:च्या चित्रपटांचे बनवले हिंदीत रिमेक
ज्या दिग्दर्शकांनी आपलेच चित्रपट हिंदीत केले आहेत
Web Title: These south directors made hindi remake of their own films spg