-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
दीपा परबसुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे.
-
दीपाने नुकतंच छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
-
झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेच्या निमित्ताने तिने घरी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
-
“गणपती मला खूप प्रिय आहे, मी लोअर परळला राहायचे. माझ्या करियरची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली”, असे दीपाने सांगितले.
-
“या उत्सवातच कार्यक्रम करून मी माझ्या करियरचा श्रीगणेशा केला”, असेही तिने म्हटले.
-
“माझ्या घरी गणपती येत नाही पण घरी देवघरातल्या गणपतीची मी मनोभावे पूजा करते”, असेही ती म्हणाली.
-
“या वर्षी मी ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा पदार्पण करत आहे ते सुद्धा ह्या गणरायाच्या आशीर्वादानेच”, असे दीपा परब म्हणाली.
“…..ते सुद्धा गणरायाच्या आशीर्वादानेच” अंकुश चौधरीच्या पत्नीने सांगितला खास योगायोग
विविध भूमिका साकारून दीपाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
Web Title: Ankush choudhary wife deepa parab share special story on ganpati special occasion nrp