• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mithun chaktraborty when get irritated by madhuri dixit actor deattached him for years nrp

‘तिने माझी फसवणूक केली’, मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षितचे संबंध बिघडण्याचं कारण आलं समोर

अचानक मिळालेल्या स्टारडमनंतर अचानक माधुरीने मिथुनसोबत काम करण्यास नकार दिला.

Updated: September 3, 2022 10:10 IST
Follow Us
    Madhuri Dixit Mithun Chakraborty 5
    आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
  • 1/15

    ८० ते ९० च्या दशकात माधुरी दीक्षित आणि मिथुन चक्रवर्ती ही जोडी घराघरात प्रसिद्ध होती.

  • 2/15

    या दोघांचा चाहता वर्ग अजूनही कायम आहे. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात आहे.

  • 3/15

    मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षित यांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. या दोघांची जोडी पडद्यावर खूप गाजली.

  • 4/15

    माधुरी दीक्षितच्या सिनेसृष्टीच्या काळात तिला मिथुनने खूप मदत केली होती. पण एकदा अचानक माधुरीने मिथुन यांच्यासोबत काम करणे बंद केले होते.

  • 5/15

    माधुरी दीक्षितने माझी फसवणूक केली, असे मिथुन चक्रवर्तीने त्यावेळी म्हटले होते.

  • ८० च्या दशकात सुरुवातीच्या काळात माधुरीच्या करिअरला चालना देण्यासाठी त्यावेळी तिचे सेक्रेटरी रिक्कू राकेश नाथ हे निर्मात्यांपेक्षा अधिक कलाकारांच्या फेऱ्या मारायचे. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी माधुरीला कास्ट करावे, असा आग्रह ते करायचे.
    एकदा अशाचप्रकारे रिक्कू यांनी मिथुन चक्रवर्ती यांना माधुरीचा फोटो दाखवला. त्यावेळी मिथुनला पाहताक्षणी माधुरी आवडली.
    त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी माधुरीची ‘इलाका’ आणि प्रेम प्रतिज्ञा या दोन चित्रपटासाठी आघाडीची नायिका म्हणून निवड केली.
    इतकेच नव्हे तर मिथुनने प्रत्येक निर्मात्याकडे माधुरीला चित्रपटात घेण्याचा आग्रह धरला. त्यावेळी मिथुनचे स्टारडम असे होते की त्याला कोणीही नाकारु शकत नव्हते, त्यामुळे माधुरीला अनेक चित्रपटांची प्रमुख नायिका म्हणून ऑफर मिळाली.
  • 6/15

    याच काळात माधुरीने अनिल कपूरसोबत ‘तेजाब’ या चित्रपटात काम केले. तिचा हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला.

  • 7/15

    ‘तेजाब’ या चित्रपटामुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. अचानक मिळालेल्या स्टारडमनंतर अचानक माधुरीने मिथुनसोबत काम करण्यास नकार दिला.

  • 8/15

    ‘तिने मला शुटींगसाठी वेळ नाही, तारखा जुळत नाही’, असे विविध कारण देत मिथुनला टाळण्यास सुरुवात केली.

  • यानंतर आता प्रत्येकवेळी ती बहाणा करुन मिथुनला टाळण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे मिथुनला समजले की आता तिला माझ्यासोबत चित्रपटांमध्ये काम करायचे नाही. तिला आता अनिल कपूरसोबत काम करणे जास्त आवडत आहे.
    दरम्यान यामुळे मिथुन आणि माधुरीमध्ये कटुता निर्माण झाली होती. अनेक वर्षानंतर आता त्यांच्यात पुन्हा एकदा मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mithun chaktraborty when get irritated by madhuri dixit actor deattached him for years nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.