-
विजयने नाटकांच्या माध्यमातून अभिनय करायला सुरुवात केली.
-
आता बॉलिवूडमध्ये विजयने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अजूनही बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा ‘डार्लिंग्स’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा चाहता वर्ग इतका वाढला आहे की परदेशातील मुली त्याला लग्नाची मागणी घालू लागल्या आहेत.
-
विजय वर्माने त्याला आलेल्या काही मेसेजेसच्या फोटोंचा व्हिडीओ बनवून शेअर केला.
-
त्याला परदेशातून लग्नाच्या मागण्या येत असल्याचे त्या फोटोंमधून समोर आले.
-
एका महिला चाहत्याने लिहिले, “कृपया पाकिस्तानात या आणि माझ्या पालकांशीही लग्नाची बोलणी करा.” यावर प्रतिक्रिया देताना विजयने लिहिले की, “लखनऊचे शूटिंग संपताच मी पाकिस्तानात येण्याचा प्लॅन बनवतो. मिर्झापूरचे शूटिंग काय सुरूच राहणार आहे.”
-
कॅनडातील एका मुलीनेही “कृपया फ्रान्सला या आणि माझ्या नवऱ्याशी लग्नाची बोलणी कर. त्यावर विजयने गमतीत उत्तर दिले की,” पती की वडील, कॅनडीन मुली”
-
फ्रान्समधील एका मुलीनेही “कृपया फ्रान्सला या, माझी आई तुझी वाट पाहत आहे,”असे लिहिले आहे. यावरही विजयने मजेशीर कमेंट करताना लिहिले की, “मला माझ्या पालकांनाच खूप कमी वेळा भेटायला मिळते.”
-
विजयने नाटकांच्या माध्यमातून अभिनय करायला सुरुवात केली. त्याने पुण्यातील एफटीआयआय येथून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
-
विजयने एमसीए या तेलुगू चित्रपटामध्येही काम केले आहे. या चित्रपटामध्ये त्याने शिवा हे पात्र साकारले होते.
-
तर तो ‘मिर्झापूर 3’च्या शूटिंगसाठी नुकताच लखनौला आला होता.
अभिनेता विजय वर्माला परदेशातून लग्नाच्या मागण्या, वाचा त्याच्या मजेशीर प्रतिक्रिया…
त्याचा चाहता वर्ग इतका वाढला आहे की परदेशातील मुली त्याला लग्नाची मागणी घालू लागल्या आहेत.
Web Title: Vijay verma fans proposed him from pakistan canada france and asked for marriage rnv