• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shaktimaan to ashwatthama theses upcoming bollywood movies to be released as trilogy avn

Photos : बॉलिवूडचं नुकसान भरून निघणार? येत्या काळात हे मोठे चित्रपट ३ भागात पाहायला मिळणार, जाणून घ्या

या चित्रपटांची कथादेखील ‘ब्रह्मास्त्र’प्रमाणे ३ भागात उलगडणार आहे.

September 19, 2022 16:43 IST
Follow Us
  • brahmastra 1
    1/15

    ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट ३ भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

  • 2/15

    चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

  • 3/15

    याच्या पुढील भागात कथा कशी उलगडेल आणि नवीन काय पाहायला मिळेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

  • 4/15

    ब्रह्मास्त्रप्रमाणेच आता आणखीनही बऱ्याच चित्रपटांचे ३ भाग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे ‘नागिन’. विशाल फुरीया दिग्दर्शित या ३ भागांच्या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 5/15

    दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ड्रीम प्रोजेक्ट ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा चित्रपटही ३ भागात उलगडणार आहे.

  • 6/15

    अभिनेता रितेश देशमुख यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 7/15

    २०२१ मध्ये याचा पहिला भाग येणं अपेक्षित होतं पण काही करणासत्व चित्रपटावरचं काम तूर्तास थांबलं आहे.

  • 8/15

    भारताचा पहिला सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

  • 9/15

    नुकतंच या चित्रपटाविषयी माहिती मिळाली तेव्हा हा चित्रपटही ३ वेगवेगळ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

  • 10/15

    या चित्रपटात शक्तिमानच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग दिसू शकतो असं म्हंटलं जात आहे.

  • 11/15

    ‘अमर अश्वत्थामा’ हा मोठा बिग बजेट चित्रपटही ३ भागात आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे.

  • 12/15

    यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता विकी कौशल आपल्याला दिसणार आहे.

  • 13/15

    ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धार हाच या तिन्ही भागांचं दिग्दर्शन करणार आहे. यानिमित्ताने आदित्य आणि विकी पुन्हा एकत्र कम करत आहेत.

  • 14/15

    बाहुबली सारखा चित्रपट देऊन साऱ्या जगाला भारतीय चित्रपटाची दखल घ्यायला लावणारे एसएस राजामौली यांनी कित्येकवेळा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’विषयी भाष्य केलं आहे.

  • 15/15

    राजामौली यावर काम करत आहेत. अजूनतरी याबाबतीत काही गोष्टी स्पष्ट झाल्या नसल्या तरी येणाऱ्या काळात राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेलं ‘महाभारत’ नक्कीच सगळे रेकॉर्ड मोडीत काढेल. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shaktimaan to ashwatthama theses upcoming bollywood movies to be released as trilogy avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.