-
गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांचे अकाली निधन झाले, त्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचेही नाव येते. (Photo : Indian Express)
-
आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अकाली जगाचा निरोप घेतला. (Instagram : Raju Srivastava)
-
विचित्र गोष्ट म्हणजे हे सर्व कलाकार सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. (Instagram)
-
राजू श्रीवास्तव: गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल असलेले राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. (Instagram : Raju Srivastava)
-
हृदयविकाराच्या झटक्याने बेशुद्ध झाल्यामुळे राजू व्हेंटिलेटरवर होते. राजू बिग बॉस ३ मध्ये दिसले होते. (Instagram : Vindu Dara singh)
-
सोनाली फोगट: अभिनेत्री सोनाली फोगट या एक राजकारणीदेखील होत्या. त्या त्यांच्या टिकटॉक व्हिडीओंसाठी खूप प्रसिद्ध होत्या. (PTI)
-
२२ ऑगस्ट २०२२ रोजी जगाचा निरोप घेतलेल्या सोनाली यांनी बिग बॉस १४ मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केली होती. (PR)
-
स्वामी ओम: असे म्हटले जाते की स्वामी ओम बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहेत. (Indian Express)
-
स्वामी ओम बिग बॉस १० मध्ये दिसले होते. गेल्या वर्षी कोविडमुळे स्वामी ओम यांचे निधन झाले. (Indian Express)
-
प्रत्युषा बॅनर्जी: बालिका वधू सीरियलमध्ये ‘आनंदी’ची भूमिका साकारणाऱ्या प्रत्युषाने २०१६ मध्ये आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. प्रत्युषा बिग बॉस ७ मध्ये दिसली होती. (Indian Express)
-
सिद्धार्थ शुक्ला: २०२१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेला सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस १३ चा विजेता ठरला. (Instagram : Sidharth Shukla)
-
सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. सिद्धार्थ शुक्ला हा एक लोकप्रिय अभिनेता होता आणि त्याचे खूप चाहते होते. (Instagram : Sidharth Shukla)
Photos : राजू श्रीवास्तव ते सिद्धार्थ शुक्ला; बिग बॉसच्या ‘या’ स्पर्धकांनी घेतली अकाली एग्झिट
आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अकाली जगाचा निरोप घेतला. विचित्र गोष्ट म्हणजे हे सर्व कलाकार ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी टीव्ही शोचा भाग राहिले आहेत.
Web Title: Raju srivastava to siddharth shukla these contestants of bigg boss took sudden exit death heart attack pvp