-
खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
सोमवारी (२६ सप्टेंबर) घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुडझेपचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला.
-
या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेच्या थराराची झलक पाहायला मिळाली.
-
यात क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक घटनेची झलक पाहायला मिळत आहे.
-
या दमदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
या ट्रेलरमधील प्रत्येक संवाद ऐकल्यानंतर अंगावर अक्षरश: काटा येतो.
-
‘शिवप्रताप-गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ट्रेलरमधील असंख्य डायलॉग हिट झाले झाले आहेत.
-
यातील काही डायलॉगची भूरळ प्रेक्षकांना पडली आहे.
-
“आग्र्यात केवळ क्रूरकर्मा औरंगजेब आपली वाट बघत नाही तर तुटलेली बोटं, लूटलेली सुरत याच्यामुळे झालेला अपमान आपली वाट बघत असेल. रोखणाऱ्या नजरा आणि उकळणाऱ्या समशेरी आपली वाट बघत असतील.”
-
“अब हिंदू हिंदू को काटेगा, शिवा को जश्न ए सालगिराह मे बुलाओ और इसी लाल किल्ले के दिवाने आम मे हम उसे उसकी औकात दिखा देंगे, शिवा यहा आकर बहुत पछातायेगा.”
-
“आऊसाहेब, या आग्राभेटीत स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि त्या दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल.”
-
“स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहिल, असंच वर्तन ठेवा. लवकरच आम्ही शंभूराजांसोबत आग्र्याला प्रस्थान करु.”
-
“शिवाजी से जो भी पंगा लेगा वो अल्लाह को प्यारा हो जाएगा. सब कहेते है की चित्ते की तरह छलांग लगाता है.”
-
“वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही. पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाहीत.”
-
“शंभूराजे दिल्लीच्या तख्तालाही मराठी मुलुखाचा स्वाभिमान हा समजलाच पाहिजे.”
-
“धाडस छातीशी आणि मरण पाठीशी बांधून जगतात मराठे”
-
“उसे ऐसी जगह मारेंगे जहा से उसके लाश की बदबू भी ना बाहर निकले.”
-
“त्या औरंगाजेबाने नजरकैद केलंय आपणास, सगळे मार्ग आता बंद झालेत.”
-
“शस्त्रांची गरज नाही मराठ्यांना लढण्यासाठी. मनगटातील ताकद आणि उरातील हिंमत पुरेशी आहे गनिमाला काढण्यासाठी.”
-
“कुणा लांडग्याच्या हातून मरण्यासाठी शिवाजी राजं जन्माला आलेला नाही.”
-
“औरंगजेब आपल्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, बुद्धीच्या भरारीवर नाही.”
-
“रयतेच्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी ही गरुडझेप घ्यावीच लागेल.”
-
दरम्यान येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती ‘जगदंब क्रिएशन’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
“वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, पण….” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या डायलॉगची प्रेक्षकांना भूरळ
या ट्रेलरमधील प्रत्येक संवाद ऐकल्यानंतर अंगावर अक्षरश: काटा येतो.
Web Title: Dr amol kolhe shivpratap garudjhep movie trailer dialog superhit goes viral nrp