-
‘मोहब्बते लुटाउंगा’ हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत उभा राहतो. त्यावेळी त्याच्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
या गाण्यामुळे अभिजीत सावंत हे नाव घराघरात प्रसिद्ध झाले. तो इंडियन आयडलच्या पर्वाचा पहिला विजेता ठरला.
-
यानंतर तो सेलिब्रेटी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत.
-
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा इंडियन आयडलच्या प्रवास आणि त्याला मिळालेली रक्कम त्याने कुठे खर्च केली याबद्दल जाणून घेणार आहोत.
-
इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या.
-
अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते. इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर त्याला ठराविक रक्कम मिळाली होती.
-
काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान त्याने इंडियन आयडलच्या जिंकलेल्या रक्कमेबद्दल भाष्य केले.
-
यावेळी त्याने ती रक्कम कुठे वापरली, त्यातून त्याचे समाधान का झाले नाही याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले होते.
-
इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर तुला काही ठराविक रक्कम मिळाली होती, त्याचे तू काय केलंस? असा प्रश्न त्याला एका मुलाखतीदरम्यान विचारला होता.
-
त्यावेळी अभिजीत म्हणाला, “मी त्या रक्कमेची उत्तम गुंतवणूक केली होती. २००८ ला आर्थिक मंदीदरम्यान आम्ही पैशांची बचत केली होती.
-
त्यातून आम्ही काही ठिकाणी गुंतवणूक केली होती. काही वर्षांपूर्वी मी एक घर खरेदी केले. पण आता मात्र मला याचा पश्चाताप होतं आहे,” असे त्याने सांगितले.
-
“कोरोना काळात मी माझ्या गाण्यांमुळे फार असमाधानी होतो. त्यावेळी सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या.”
-
“पैसे मिळत होते. पण त्यावेळी मी फार असमाधानी होतो.”
-
“जेव्हा तुम्ही पैशांच्या मागे धावत असता, त्यावेळी तुम्हाला तुमची प्रतिभा, तुमचे संगीत, तुमचे ज्ञान यासारख्या अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते,” असेही तो म्हणाला.
-
अभिजीतने इंडस्ट्रीतील शो-ऑफ संस्कृतीबद्दलही भाष्य केले.
-
यावेळी त्याने कबूल केले की त्यालाही यापुढे झुकावे लागतं.
-
अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते.
-
सध्या तो लाइमलाइटपासून लांब असल्याचे पाहायला मिळते.
“आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा
इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते
Web Title: Abhijeet sawant birthday singer reveals what he did with the money after win indian idol first season nrp