-
भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या सफर अफशा या अभिनेत्रीने मनोरंजन सृष्टीतून बाहेर पडत असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली आहे.
-
सहरने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
-
“मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की मी आजपासून मनोरंजन व्यवसायापासून फारकत घेत आहे. यापुढे इस्लाम आणि अल्लाहची सेवा हेच माझ्या जीवनाचं ध्येय असेल. मी माझ्या परमेश्वराकडे केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागते, माझ्या नवीन प्रवासासाठी तुमच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत,” असं सहरने आपला निर्णय घोषित करताना सांगितलं.
-
पण देव किंवा धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडणारी सफर अफशा ही पहिली अभिनेत्री नाही. अशाच काही अभिनेत्रींची नावे आज जाणून घेऊयात.
-
‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री झायरा वसीम चित्रपटसृष्टी सोडून अध्यात्माच्या वाटेवर गेली. आपल्या फिल्मी करिअरमुळे इस्लामसोबतचं नातं धोक्यात आल्याचं तिने म्हटलं होतं.
-
अक्षय कुमार ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री बरखा मदान फिल्म इंडस्ट्री सोडून बौद्ध भिक्खू बनली आहे. तिने बौद्ध धर्म स्वीकारला असून स्वतःचे नाव ग्याल्टन सॅमटेन ठेवलंय.
-
टीव्ही अभिनेत्री आणि ‘दिया और बाती’ फेम नुपूर अलंकारने अभिनय जगतापासून संन्यास घेतला आहे. सध्या ती हिमालयात राहतेय.
-
‘अनुपमा’ सारख्या मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री अनघा भोसले टीव्ही इंडस्ट्रीला रामराम करून भगवान कृष्णाची भक्त झाली आहे. मात्र, चांगली संधी मिळाल्यास टीव्हीवर परतण्याचा विचार करू शकते, असं तिचं म्हणणं आहे.
-
‘लगान’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली ग्रेसी सिंग ब्रह्माकुमारी अध्यात्मिक संस्थेशी जोडली गेली आहे आणि ती आध्यात्मिक प्रवचनात वेळ घालवत आहे.
-
ग्लॅमर इंडस्ट्रीला अलविदा करत सना खानने अध्यात्माचा मार्ग निवडला होता. अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर चालत मानवजातीच्या सेवेसाठी आपला वेळ घालवायचा आहे, असे तिने निर्णय जाहीर करताना सांगितले होते. सनाचे लग्न सूरतच्या मौलवी अनस सय्यदशी झाले आहे.
-
‘आशिकी’ चित्रपटाची नायिका अनु अग्रवाल एका अपघातात गंभीर जखमी झाली होती. यानंतर तिने ग्लॅमर इंडस्ट्री सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. आता ती संन्यासीप्रमाणे जीवन जगत आहे.
-
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ७ व्या सीझनमध्ये दिसलेली अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात अध्यात्माचा मार्ग निवडून नन बनली आहे. तिने स्वतःचे नाव गाया सोफिया मदर असं ठेवलंय.
कुणी इस्लाम तर कुणी कृष्णाच्या भक्तीसाठी सोडलं अभिनय क्षेत्र; ‘लगान’ चित्रपटाच्या नायिकेचाही समावेश
धर्मासाठी ‘या’ अभिनेत्रींनी केला फिल्मी करिअरला अलविदा; लगान चित्रपटातील नायिकेचाही समावेश
Web Title: Sahar ashfa zaira waseem sanna khan barkha madan nupur alankar gracy singh actresses left bollywood for spirituality religion hrc