-
मराठीमध्ये सध्या ‘हर हर महादेव’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
-
काही तासांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
-
चित्रपटाच्या ट्रेलरला काही तासांमध्येच लाखो लोकांनी पसंती दर्शवली.
-
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली असताना ‘हर हर महादेव’ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या चित्रपटामध्ये मराठीमधील सुप्रसिद्ध चेहरे काम करताना दिसणार आहेत.
-
शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे तर अमृता खानविलकर बाजीप्रभू यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.
-
हार्दिक जोशी, शरद पोंक्षे यांचीही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
-
अभिनेता सुबोध भावे ‘हर हर महादेव’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
-
याआधी मराठीमधील काही अभिनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली.
-
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील सुबोध प्रेक्षकांना पटला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
-
‘हर हर महादेव’चा ट्रेलर पाहिल्यानंतर शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला हवी होती, शंतनू मोघेनेही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली असती अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (सर्व फोटो – युट्युब, इन्स्टाग्राम)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील सुबोध भावे प्रेक्षकांना रुचेना, कमेंट करत म्हणाले, “अशी ऐतिहासिक…”
मराठीमधील बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट ‘हर हर महादेव’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
Web Title: Subodh bhave play chatrapati shivaji maharaj role in har har mahadev marathi movie people reaction see details kmd