Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 7 films will be releasing in theatre on this diwali rnv

Photos: या दिवाळीत प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ; १-२ नव्हे, तर ‘हे’ ७ बहुचर्चित चित्रपट होणार प्रदर्शित

गेली दोन – अडीच वर्ष कोरोनामुळे चित्रपटगृहं बंद होती. गेल्या दिवाळीपासून थिएटरमध्ये चित्रपट पुन्हा प्रदर्शित होऊ लागले. आता यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण मराठी, हिंदी आणि दक्षिणात्य मिळून एकूण ७ चित्रपट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

October 17, 2022 16:21 IST
Follow Us
  • diwali-films-8
    1/9

    अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘राम सेतु’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ही एका आर्कियोलॉजिस्टवर आधारित आहे. भारत-श्रीलंकाच्यामध्ये असलेल्या राम सेतुभोवती या चित्रपटाची कथा फिरते. 

  • 2/9

    अक्षयच्या ‘राम सेतु’बरोबरच अजय देवगणचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपटही २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

  • 3/9

    या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

  • 4/9

    या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 5/9

    तर अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. पावनखिंडीतील थरार या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे

  • 6/9

    हिंदी आणि मराठीबरोबरच साऊथचे अनेक मोठे चित्रपट या दिवाळीत येणार आहेत. अभिनेता कार्तीचा ‘सरदार’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तामिळनाडू बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची ‘प्रिन्स’शी टक्कर होणार आहे.

  • 7/9

    शिवकार्तिकेयन स्टारर ‘प्रिन्स’ दिवाळी वीकेंडला येणार आहे. हा चित्रपट २१ ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

  • 8/9

    विश्व मंचूचा तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपट ‘गिन्ना’ 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाची टक्कर ‘उरी देवुदा’सोबत होईल.

  • 9/9

    विश्वक सेन आणि मिथिला पालकर यांचा ‘उरी देवुडा’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 7 films will be releasing in theatre on this diwali rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.