-
‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ हा जर्मन चित्रपट या आठवड्यात २८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा युद्धपट आहे.
-
‘गुड नर्स’ हा चित्रपट २६ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा एक क्राइम ड्रामा चित्रपट आहे.
-
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन दिवाळीच्या मुहूर्तावर डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
-
नेटफ्लिक्सच्या क्राइम थ्रिलर डॉक्युमेंट्री सिरीज ‘इंडियन प्रीडेटर: मर्डर इन अ कोर्टरूम’चा तिसरा सिझन २८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. अक्कू यादव नावाच्या सीरियल रेपिस्ट आणि किलरची कोर्टरूममध्ये घुसून १०० हून अधिक महिलांच्या जमावाने नागपूरमध्ये हत्या केली होती, त्यावर ही कथा आधारित आहे.
-
‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ ही अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विग्नेश यांच्या लग्नावर आधारित डॉक्युमेंट्री दिवाळीला नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होत आहे.
-
या दोघांच्या लग्नाला रजनीकांतपासून ते शाहरुख खानपर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
यामी गौतम आणि सनी कौशल यांचा ‘चोर निकल के भागा‘ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा एक थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे.
-
विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट आगामी काळात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
-
शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.
Photos: आगामी काळ मनोरंजनाचा, ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘या’ बहुचर्चित कलाकृती
गेल्या काही वर्षात एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटगृहांमध्ये त्यांच्यात स्पर्धा पहायला मिळते. तसेच काहीसे चित्र आता हळूहळू ओटीटीवरही दिसणार आहे.
Web Title: New films and series will be releasing on ott platform in next few days rnv