-
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छालच्या लग्नाच्या गेले काही दिवस चर्चा रंगल्या होत्या.
-
आता आज संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा याच्याशी तिचा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
यांच्या लग्नाच्या मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.
-
त्यावेळी पलकने केलेल्या लूकवर सर्वजण फिदा झाले होते.
-
तेव्हापासून त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्याची सर्वांना आतुरता होती.
-
आज अखेर थाटामाट त्यांचं लग्न पार पडलं.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.
-
लग्नात मिथुनने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी, त्यावर लाल रंगाचा दुपट्टा आणि डोक्यावर लाल रंगाचा फेटा परिधान केला होता. तर पलकने लाल रंगाचा घागरा परिधान केला होता.
-
मित्र मंडळी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या विवाहसोहळ्याचे फोटो समोर येताच मिथुन आणि पलकच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Photos: पलक मुच्छाल आणि मिथुन शर्मा यांचा राजेशाही विवाहसोहळा संपन्न, पहा फोटो
आज संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा याच्याशी पलक मुच्छालचा विवाहसोहळा संपन्न झाला.
Web Title: Palak muchhal mithun sharma wedding photos are out rnv