-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. करिअरपेक्षा मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरते.
-
मलायका अरोरा लवकरच ‘मूव्हिंग विथ मलायका’ या तिच्या आगामी वेब शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या शोमध्ये मलायकाचं खासगी आयुष्य, तिचं राहणीमान आणि तिच्या आयुष्यातील अशा काही गोष्टींचा खुलासा होणार आहे ज्या या आधी कुणीच ऐकलेल्या नाहीत.
-
अशातच आता मलायकाचा शो टेलिकास्ट होण्याआधी तिच्या घराचे काही इनसाइड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सोशल मीडियावर चर्चेत असणारी मलायका अरोरा कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्या घराच्या नेमप्लेटवरूनच तिचं घर किती आलिशान आणि सुंदर असेल याची कल्पना येते.
-
मलायकाच्या घराची लिव्हिंग रुम खूपच सुंदर असून त्यातील एंटरियर सर्वांचं लक्ष वेधून घेतं
-
मलायकाच्या घरातील आलिशान बेडरूम. या बेडरुममध्ये बेडला अनुरुप रंगसंगतीचे पडदे आणि बेडशीटनी खूपच सुंदर लूक दिला आहे.
-
कमीत कमी फर्निचर आणि सुटसुटीत असं किचन मलायका अरोराच्या घरात आहे.
-
याशिवाय मलायकाच्या घरातील इतर सजावट आणि एंटिरियरही खूपच खास आहे.
-
फिक्कट रंगांची रंगसंगती मलायकाच्या घरात प्रामुख्याने दिसून येते. जी घराच्या डायनिंग एरियामध्येही पाहायला मिळते.
-
एकूणच कोट्यवधीची मालकीण असलेल्या मलायका अरोराच्या घराचा थाट काही न्याराच आहे.
-
(फोटो साभार- मलायका अरोरा इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)
कोट्यवधीची मालकीण असलेल्या मलायका अरोराचं घर आतून कसं दिसतं? पाहा Inside Photos
मलायका अरोरा लवकरच ‘मूव्हिंग विथ मलायका’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Web Title: Malaika arora home look like this inside photos goes viral mrj