-
बिगबॉस हा शो सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग असून आतापर्यंतचे याचे सर्व पर्व विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
-
लवकरच बिगबॉस १६मध्ये नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सध्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. आज आपण बिगबॉस १६चे संभाव्य वाईल्ड कार्ड स्पर्धकांची नावे जाणून घेऊया.
-
टीव्ही अभिनेता विकास मंकतला लवकरच ‘बिगबॉस १६’ मध्ये प्रवेश करणार आहे. त्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री निश्चित झाली आहे. शोमध्ये जाण्यापूर्वी, त्याने एका क्लिपमध्ये सांगितले होते की, त्याला कोणत्याही ग्रुपचा भाग व्हायचे नाही.
-
टीव्ही अभिनेता रोहन गंडोत्रा यालाही ‘बिगबॉस १६’ ची ऑफर आली आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याची आणि निर्मात्यांची बोलणी सुरू असून तो वाइल्ड कार्ड एन्ट्रीही घेऊ शकतो.
-
‘बिगबॉस ओटीटी’ आणि ‘बिगबॉस १५’ मध्ये दिसलेला निशांत भट्ट ‘बिगबॉस १६’चा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करू शकतो. काही काळापूर्वी एका मुलाखतीत त्याने पुन्हा बिगबॉसमध्ये जाण्याचा विचार करणार असल्याचे सांगितले होते.
-
‘खतरों के खिलाडी १२’ आणि ‘झलक दिखला जा १०’ या टीव्ही शोमध्ये दिसलेल्या फैसल शेखला ‘बिगबॉस १६’ मधून ऑफर मिळाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत.
-
‘बिगबॉस १६’ मधील वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या यादीत टीव्ही अभिनेता कुशाग्र दुआचेही नाव आहे. त्याला निर्मात्यांकडून ऑफर आली आहे.
-
‘बिगबॉस ११’ आणि ‘बिगबॉस १४’मध्ये धुमाकूळ घातलेली अर्शी खान ‘बिगबॉस १६’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता नमिश तनेजादेखील ‘बिगबॉस १६’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे, परंतु अद्याप त्याची पुष्टी होणे बाकी आहे.
-
‘फॅमिली टास्क’च्या वेळी सर्व सदस्यांसह शिव ठाकरेने कन्फेशन रुममध्ये बिग बॉससमोर आपलं मन मोकळं त्याला अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला होता.
-
नेहमीच खंबीर राहणाऱ्या शिवला रडताना पाहून सगळेच हैराण झाले. त्यानंतर अभिनेत्री वीणाने शिव ठाकरेला पाठिंबा दिला. तिने त्याच्यासाठी खास पोस्टही लिहिली होती.
-
यानंतर वीणा जगतापही शोमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘बिगबॉस मराठी २’मध्ये वीणा आणि शिव एकत्र होते. हे पर्व शिवने जिंकले. (Photos: Instagram)
Photos: शिव ठाकरेसाठी वीणा जगताप घेणार ‘बिगबॉस १६’च्या घरात एन्ट्री? पाहा, नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची यादी
लवकरच बिगबॉस १६मध्ये नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सध्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत.
Web Title: Will veena jagtap enter bigg boss 16 house for shiv thakare check out the list of new wild card contenders tina dutta nimrit pvp