-
‘पावनखिंड’ या चित्रपटात ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका साकरणारा अभिनेता हरीश दुधाडे हा लग्नबंधनात अडकला आहे. नुकतंच त्याने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली आहे.
-
हरीशने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत आहे.
-
हरीशने यावेळी छान सदरा लेहंगा आणि फेटा असा पारंपारिक लूक केला आहे. तर त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
हरीश दुधाडेच्या पत्नीचे नाव समृद्धी निकम असे आहे.
-
“आणि नवीन प्रवासाला सुरुवात…” असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने #wedding #weddingday #happilymarried असे हॅशटॅगही शेअर केले आहेत.
-
अभिनेता अंकित मोहनने त्याला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्या दोघांचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यात हरीश आणि त्याची पत्नी हे दोघेही वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
“भाग्यवान लोकांच्या क्लबमध्ये स्वागत आहे. तुमच्या दोघांसाठी मी आनंदी आहे. खूप खूप प्रेम”, असे अंकितने यात म्हटले आहे.
-
“माझं प्रेम दुसऱ्या कोणाचं प्रेम होताना…” असेही त्याने यात लिहिले आहे.
“माझं प्रेम दुसऱ्याचं होताना…” हरीश दुधाडेच्या लग्नानंतर अंकित मोहनची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘पावनखिंड’ या चित्रपटात ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका साकरणारा अभिनेता हरीश दुधाडे हा लग्नबंधनात अडकला आहे
Web Title: Actor ankit mohan congratulate pawankhind fame actor harish dudhade after her wedding nrp