-
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर रितेश आणि जेनेलिया ही जोडी आपल्याला पडद्यावर दिसणार आहे.
-
३० डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यामध्ये सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे. याआधी ‘लय भारी’ या चित्रपटातही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.
-
दरम्यान हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘माजिली’ या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. मात्र रितेशने सांगितले की या चित्रपटात प्रेक्षकांना आणखी काही नव्या गोष्टीही पाहायला मिळणार आहेत.
-
वेड चित्रपटात मीरा ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध बालकलाकार खुशी हजारे हिने साकारली आहे.
-
खुशीने आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच अनेक जाहिरातींमध्ये काम केलेले आहे.
-
२०२० सालच्या ‘प्रवास’ या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.
-
नुकतीच तिने ‘आपडी थापडी’ या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि मुक्त बर्वे यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
-
२०१६ साली खुशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘सरबजीत’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली.
-
तर नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित ‘मंटो’ चित्रपटातही तिने अभिनय केला आहे.
-
यानंतर ती अभिनेता विकी कौशलसह ‘भूत’ या भयपटातही दिसली होती.
-
जान्हवी कपूरच्या ‘मिली’ या चित्रपटात तिने एक छोटी भूमिका साकारली आहे.
-
‘वेड’ हा खुशीने अभिनित केलेला तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून तिच्या येण्यामुळे कथानकात ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. (Photos: Instagram)
Photos: ‘वेड’ चित्रपटातील बालकलाकाराबद्दलच्या खास गोष्टी! अशोक सराफ, ऐश्वर्या राय, विकी कौशलसहीत अनेकांबरोबर केलंय काम
वेड चित्रपटात मीरा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या खुशीने आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच नामवंत जाहिरातींमध्ये काम केलेले आहे.
Web Title: Special things about the child actor in the movie ved worked with ashok saraf aishwarya rai vicky kaushal and many other actors pvp