-
वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा हरहुन्नरी कलाकार चिन्मय मांडेलकर आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
-
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या आगामी चित्रपटात तो नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहे.
-
नथुराम यांची भूमिका याआधी अभिनेता होर्स्ट बुचोल्झने १९६३ मध्ये आलेल्या ‘नाईन अवर्स टू रामा’ या चित्रपटात साकारली होती. महात्मा गांधींच्या हत्येपूर्वीच्या गोडसेच्या आयुष्यातील नऊ तासही या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
-
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ चित्रपटात अभिनेता हर्ष नय्यरने नथुरामची भूमिका साकारली होती.
-
मराठीतले आघाडीचे अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात नथुरामची भूमिका साकारली होती. या नाटकावरून बराच गदारोळ झाला होता.
-
केवळ नाटकातच नव्हे तर शरद पोंक्षे यांनी कमल हासन यांच्या ‘हे राम’ चित्रपटात त्यांनी नथुरामचीच भूमिका साकारली होती.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे कायम चर्चेत असतात.
-
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो अथवा संभाजी महाराज असो. या भूमिकांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.
-
डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील २०१७ साली ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुरामची भूमिका साकारली होती. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती मात्र त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते की “मी शेवटी एक कलाकार आहे, याचा राजकारणाशी संबंध जोडू नये.” फोटो सौजन्य : जनसत्ता
Photos : आतापर्यंत ‘या’ अभिनेत्यांनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, कोणाला जीवे मारण्याच्या धमक्या, तर कोणावर झाली टीका
चिन्मय मांडलेकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लूकची झलक शेअर केली आहे
Web Title: Chinmany mandlekar to sharad ponkshe who play nathuram godse role and faced controversy spg