-
अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. चित्रपट, मालिका असो वा खासगी आयुष्य ती सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते.
-
सध्या ऋता पती प्रतीक शहाबरोबर परदेशात सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे.
-
ती सध्या दुबईमध्ये मनसोक्त फिरत आहे.
-
दुबईमधील नवऱ्याबरोबरचे काही फोटोही ऋताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहेत.
-
त्याचबरोबरीने २७ डिसेंबरला प्रतीकचा वाढदिवस होता.
-
दुबईमध्येच ऋताने तिच्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला.
-
तसेच नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
प्रतीकबरोबरचे काही रोमँटिक फोटोही ऋताने शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
-
प्रतीकला मिठी मारतानाचा फोटो फारच सुंदर असल्याचं तिचे चाहतेही म्हणत आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नवऱ्याबरोबर दुबईमध्ये पोहोचली ऋता दुर्गुळे, रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या दुबईमध्ये पतीसह सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. यादरम्यानचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.
Web Title: Hruta durgule dubai trip with husband prateek shah share romantic photo on instagram see pic kmd