-   रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. 
-  हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. 
-  जिनिलीयाचं मराठीमध्ये पदार्पण तर रितेशचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 
-  या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवरही ‘वेड’चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 
-  या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. 
-  तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला. 
-  रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये ‘वेड’ चित्रपटाने कमावले. 
-  प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी २ कोटी ६५ लाख रुपये तर सहाव्या दिवशी २ कोटी ५५ लाख रुपयांचा फायदा ‘वेड’ चित्रपटाला झाला. 
-  या चित्रपटाने आतापर्यंत १८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. 
-  रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. 
-  आता ‘वेड’ चित्रपट कमाईच्या बाबतीत इतर चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का? हे पाहावं लागेल. 
-  (सर्व फोटो – फेसबुक) 
रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरहिट, सहा दिवसांमध्येच कमावले इतके कोटी
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कितपत कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Riteish deshmukh genelia ved marathi movie box office collection day 6 see details kmd